अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामाला विजेता संघ मिळाला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत करत पदार्पणातच विजयी चषक उंचावला आहे. त्यामुळे आयपीएल जिंकणारा हार्दिक पंड्या सातवा कर्णधार ठरला.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाने हंगामाची सुरूवातच जबरदस्त केली. त्यांनी पहिल्याच सामन्यात लखनऊ सुपर जायट्ंस या संघाचा पाच विकेट्सने पराभव करत स्पर्धेचा विजयी प्रवास सुरू केला. त्यांनी १४ पैकी १० साखळी सामने जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान गाठले होते. तसेच पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानाचा ७ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यांचा हा प्रवास आश्चर्यकारकरित्या चांगला होता.
क्रिकेट जगामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या या लीगला २००८मध्ये सुरूवात झाली. त्यावेळी आठ संघ खेळले होते. तर त्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्स होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) ३ विकेट्सने पराभव केला होता.
आता नुकत्याच पार पडलेल्या पंधराव्या हंगामात दहा संघ खेळले आहेत. याआधी २०११च्या हंगामात दहा संघ खेळले होते. तर २०१२ आणि २०१३च्या आयपीएल हंगामात ९ संघांचा समावेश होता.
तसेच सर्वाधिक आयपीएलचा चषक मुंबई इंडियन्सच्या संघाने जिंकला आहे. त्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. मुंबईनंतर चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएलच्या विजेत्यापदावर आपले नाव कोरले आहे. त्यांनी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०१०, २०११, २०१८ आणि २०२१मध्ये अशी कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियाच्या आणि चार भारतीय खेळाडूंनी संघांचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकावली आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नने २००८मध्ये राजस्थानकडून, २००९मध्ये ऍडम गिलख्रिस्टने डेक्कन चार्जर्सकडून आणि २०१६मध्ये डेविड वॉर्नरने सनरायजर्स हैद्राबादकडून आयपीएलचा चषक जिंकला आहे.
हार्दिक हा आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवत विजेतेपद पटकावणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी एसएस धोनी, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनी आयपीएलचे हंगाम जिंकले आहेत.
आयपीएलचे विजेतेपद पटकावणारे कर्णधार-
२००८ – शेन वॉर्न (राजस्थान रॉयल्स)
२००९ – ऍडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स)
२०१० – एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्ज)
२०११ – एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्ज)
२०१२ – गौतम गंभीर (कोलकाता नाईट रायडर्स)
२०१३ – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
२०१४ – गौतम गंभीर (कोलकाता नाईट रायडर्स)
२०१५ – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
२०१६ – डेविड वॉर्नर (सनरायजर्स हैद्राबाद)
२०१७ – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
२०१८ – एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्ज)
२०१९ – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
२०२० – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
२०२१ – एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्ज)
२०२२ – हार्दिक पंड्या (गुजरात टायटन्स)
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बटलरने ९७३ धावांचा विक्रम मोडला नाही, पण ‘या’ पराक्रमात विराटला मागे टाकलेच
आयपीएलमधील कामगिरीचे बटलरला मिळणार बक्षीस? कसोटीतील पुनरागमाबद्दल मॅक्यूलमची मोठी प्रतिक्रिया