---Advertisement---

IPL 2022| जडेजाची १ विकेट ३.२ कोटीला, तर चौधरीने करून दिले पैसे वसूल, पाहा महागडे आणि स्वस्त गोलंदाज

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगामाचा विजेता गुजरात टायटन्स ठरला. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याने केले असून त्याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपदही सोपवले जाईल की नाही? याची चर्चा होत आहे. तत्पूर्वी या आयपीएल हंगामात अनेक खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यातील काहींची चांगली तर काहींची कामगिरी खराब झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजासाठी हा आयपीएल (IPL) हंगाम निराशाजनकच ठरला आहे. तसेच तो या हंगाातात चेन्नईकडून सर्वात महागडा तर मुकेश चौधरी हा सगळ्यात स्वस्त गोलंदाज ठरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल याची एक विकेट १.५ कोटीला पडली आहे. या लेखामध्ये आपण कोणता गोलंदाज स्वस्त आणि महाग ठरला? हे पाहणार आहोत.

१. मुकेश चौधरी – मुकेश चौधरी याला चेन्नई संघाने २० लाखांमध्ये संघात विकत घेतले होते. त्याने १३ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या. तर त्याने घेतलेली एक विकेट १.२५ लाखाला पडली.

२. मोहसिन खान – लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या या खेळाडूने संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. त्याने ९ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. २० लाखाच्या मुळ किंमतीमध्ये संघात येत त्याची एक विकेट १.४२ लाखाला पडली आहे.

३. कुलदिप सेन – राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने घेतलेली एक विकेट २.५० लाखाला पडली. त्याने ७ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळणाऱ्या या खेळाडूकडून पुढील हंगामात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

४. रमनदीप सिंह – या फिरकीपटूला मुंबई इंडियन्स संघाने २० लाखाच्या मुळ किंमतीवर संघात घेतले. त्याने पाच सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याची एक विकेट संघासाठी ३.३३ लाखांना पडली. तसेच आयपीएल २०२२ चा हंगाम मुंबईसाठी निराशाजनक ठरला.

५. कुमार कार्तिकेय – या फिरकीपटूलाही मुंबईने २०२२च्या आयपीएल लिलावातून २० लाख मुळ किंमतीमध्ये संघात घेतले. त्याला या हंगामात अधिक संधी मिळाल्या नाहीत. त्याने ४ सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या. तर त्याने घेतलेली एक विकेट ४ लाखाला पडली.

आयपीएल २०२२ हंगामातील सर्वात स्वस्त गोलंदाज (१ विकेटची किंमत)
मुकेश चौधरी – १.२५ लाख
मोहसिन खान – १.४२ लाख
कुलदिप सेन – २.५० लाख
रमनदीप सिंह – ३.३३ लाख
कुमार कार्तिकेय – ४ लाख

रविंद्र जडेजा, ख्रिस जॉर्डन आणि अक्षर पटेल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली. मात्र २०२२चा आयपीएल हंगाम त्यांच्यासाठी अतिशय खराब ठरला आहे. त्याचबरोबर वरून चक्रवर्ती आणि मोहमद सिराज यांना त्यांच्या फ्रॅंचायजीने मोठी रक्कम देत संघात घेतले होते. यांनीही चाहत्यांची चांगलीच निराशा केली आहे.

१. रवींद्र जडेजा –  २०२२च्या लिलावात चेन्नईने जडेजाला १६ कोटींमध्ये संघात कायम केले आणि त्याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली होती. पण आपल्या नेतृत्त्वात संघाला अपेक्षित यश मिळवून न देता आल्याने पुन्हा एमएस धोनीकडे संघाची कमान सोपवली गेली. तसेच गोलंदाजी आणि फलंदाजीतही तो अपयशी ठरला. त्याने या हंगामात १० सामन्यांत पाच विकेट्स घेतल्याने त्याची एक विकेट ३.२ कोटीला पडली आहे. तर तो या आयपीएल हंगामातला सर्वात महाग गोलंदाज ठरला आहे.

२. ख्रिस जॉर्डन – आयपीएल २०१६मध्ये पदार्पण करणाऱ्या जॉर्डनला चेन्नईने २०२२च्या लिलावात ३.६ कोटीमध्ये विकत घेतले. यावेळी त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्याने ४ सामन्यांत २ विकेट्स घेतल्या असल्याने त्याची एक विकेट १.८ कोटीला पडली.

३. अक्षर पटेल २०१९च्या आयपीएल हंगामापासून दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असलेल्या फिरकीपटू अक्षर पटेलने मागील दोन हंगामात संघासाठी चांगली कामगिरी केली होती. तसेच तो फलंदाजीत चांगले शॉट्स मारण्यात पटाईत असल्याने त्याला दिल्लीने ९ कोटीमध्ये संघात कायम ठेवले. पण नुकत्याच झालेल्या हंगामात त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी चालली नाही. त्याने १३ सामन्यांत फक्त ६ विकेट्स घेतल्यामुळे त्याच्या एका विकेटची किंमत १.५ कोटी एवढी झाली.

४. वरूण चक्रवर्ती – आयपीएल २०२१च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सनेकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या चक्रवर्तीला ८ कोटीमध्ये संघात कायम ठेवले. त्याने पंधाराव्या आयपीएल हंगामातील ११ सामने खेळत ६ विकेट्स घेतल्या. यामुळे त्याची एक विकेट १.३३ कोटीला पडली.

५. मोहमद सिराज – आयपीएल २०१७मध्ये २.०६ कोटीमध्ये हैद्राबादकडून खेळणाऱ्या सिराजला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर २०१८च्या हंगामात संघात घेतले. त्याचे गोलंदाजीतील सातत्य पाहत बेंगलोरने त्याला ७ कोटीमध्ये संघात कायम ठेवले. त्याने २०२२च्या हंगामात १५ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या. तर त्याची एक विकेट ७७.७७ लाखाला पडली.

आयपीएल २०२२ हंगामातील सर्वात महाग गोलंदाज (१ विकेटची किंमत)
रवींद्र जडेजा – ३.२ कोटी
ख्रिस जॉर्डन – १.८ कोटी
अक्षर पटेल – १.५ कोटी
वरूण चक्रवर्ती – १.३३ कोटी
मोहमद सिराज – ७७.७७ लाख

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘महिला आयपीएल’चा मुहूर्त ठरला! सीएसकेची वुमन्स टीमही स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत

चुना लगा दिया! गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपद राजीनामाच्या प्रँकनंतर चाहत्यांकडून मीम्सची बरसात

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; आठपैकी दोन सामने होणार अमेरिकेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---