मुंबई। इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १३वा सामना मंगळवारी (०५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडिअम येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संभावित संघ
फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या हंगामात २ सामने खेळले आहेत. बेंगलोरने त्यांचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध झाला होता. त्यात त्यांना ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा सामना केला. त्यात त्यांना ३ विकेट्सने विजय मिळवता आला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी बेंगलोरच्या संभावित ११ जणांच्या (RCB Predicted XI) संघाबद्दल बोलायचं झालं, तर कर्णधार फाफ डू प्लेसिस अनुज रावतसह सलामीला उतरू शकतो.
तसेच, मधल्या फळीत विराट कोहली, डेविड विली आणि अष्टपैलू शेरफेन रुदरफोर्ड यांना मधली फळी सांभाळावी लागेल. तसेच, यांना यष्टीरक्षक दिनेश कार्तिकही साथ देऊ शकतो. दुसरीकडे शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असू शकेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संभावित संघ- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद/महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, डेविड विली, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
असा असू शकतो राजस्थान रॉयल्सचा संभावित संघ
आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामाचा किताब आपल्या नावावर करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने १५व्या हंगामात आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. तसेच, त्यांनी हे दोन्ही सामने २ जिंकले आहेत. राजस्थानने खेळलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. आता ते सलग तिसरा विजय मिळवण्याच्या इराद्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध आयपीएल २०२२चा १३वा सामना खेळणार आहेत.
राजस्थान संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत बोलायचं झालं, तर जोस बटलर आणि युवा फलंदाज यशस्वी जयसवाल सामन्याची सुरुवात करू शकतात. तसेच, मधल्या फळीची जबाबदारी देवदत्त पडिक्कल, कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर असू शकते. तसेच, अष्टपैलू म्हणून रियान पराग संघात स्थान मिळवू शकेल. गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर आर अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी या खेळाडूंवर गोलंदाजीची जबाबदारी असू शकते.
राजस्थान रॉयल्सचा संभावित संघ- जोस बटलर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार और यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी
अशी असू शकते ड्रीम ११
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) संघात होणाऱ्या सामन्यातील ड्रीम ११बद्दल (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला संधी दिली जाऊ शकते. तसेच फलंदाजीत, संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पडिक्कलला संधी दिली जाऊ शकते. तसेच, अष्टपैलू म्हणून वनिंदू हसरंगा आणि रियान पराग चांगले पर्याय ठरू शकतात. याव्यतिरिक्त गोलंदाजीत युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि मोहम्मद सिराजला संघात घेऊ शकता.
असा बनवू शकतो ड्रीम ११ –
कर्णधार – फाफ डू प्लेसिस
उपकर्णधार – हर्षल पटेल
यष्टीरक्षक – दिनेश कार्तिक
फलंदाज – विराट कोहली, संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल
अष्टपैलू – वनिंदू हसरंगा, रियान पराग
गोलंदाज – युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद सिराज
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
ताकदच बनली कमजोरी! लखनऊच्या फलंदाजांकडून SRHच्या ‘स्पीडस्टार’ उमरान मलिकची धू धू धुलाई