यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२ हंगामातील अर्ध्याच्या वर सामने खेळून झाले आहेत. यातील अनेक सामने रोमांचक पद्धतीने पार पडले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये शनिवारी (दि. ३० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्समध्ये पार पडलेला आयपीएल २०२२मधील ४३वा सामना चाहते नेहमी आठवणीत ठेवतील. यामागील कारणही तसेच आहे. या सामन्यादरम्यान गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या खिलाडूवृत्तीने सर्वांचे मन जिंकले.
झालं असं की, बेंगलोर संघाने (Royal Challengers Bangalore) या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी बेंगलोरच्या डावाच्या शेवटचे षटक गुजरातचा (Gujarat Titans) गोलंदाज अल्झारी जोसेफ टाकत होता. दुसरीकडे स्ट्राईकवर महिपाल लोमरोर होता. जोसेफने षटकातील चौथा चेंडू महिपालला टाकला असता, त्याने हवेत जोरदार फटका मारला. त्याने मारलेला चेंडू पाहून असे वाटले होते की, तो सहजरीत्या सीमारेषेच्या पलीकडे जाईल. मात्र, तसे काही झाले नाही. चेंडू कॅमेऱ्यासाठी लावण्यात आलेल्या तारेला धडकून मैदानावरच पडला. याचवेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या डेविड मिलरने झेल घेतला.
यादरम्यानचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सहसा अशावेळी मैदानावर क्षेत्ररक्षण करत असलेला संघ जल्लोष साजरा करताना दिसतो. मात्र, यंदा असे काहीच झाले नाही. खरं तर, पंचांनी निर्णय देण्यापूर्वी पंड्याने इशारा करत सांगितले की, हा झेल मान्य केला जाणार नाही. कारण, चेंडू हवेतील तारेला धडकला होता. पंड्याचा हा प्रामाणिकपणा चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. असे असले, तरीही महिपालनेही या निर्णयावर रिव्ह्यू मागितला. यावेळी स्पष्टपणे दिसले की, चेंडू तारेला धडकला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शमीसोबतच्या वागणुकीमुळे झाला होता ट्रोल
यापूर्वी गुजरात आणि हैदराबाद संघात झालेल्या सामन्यादरम्यान मोहम्मद शमीच्या संथ क्षेत्ररक्षणावर हार्दिक पंड्या चांगलाच संतापलेला दिसला होता. त्यावेळी त्याच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. एका वरिष्ठ खेळाडूसोबत अशाप्रकारे वागल्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी दोन्ही खेळाडूंना या प्रकरणावर मौन पाळले होते. त्यानंतर आता बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात प्रामाणिकपणा दाखवल्याने पंड्याने आपल्याबद्दल असलेली नकारात्मक प्रतिमाही दूर करण्याचा प्रयत्न केला.
सामन्याबद्दल थोडक्यात
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने २० षटकात ६ विकेट्स गमावत १७० धावा चोपल्या होत्या. यामध्ये विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. हे आव्हान गुजरात संघाने १९.३ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. या विजयामुळे गुजरातने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL| पुढील वर्षी धोनीची जागा घेत ‘हे’ ३ खेळाडू बनू शकतात चेन्नईचे भविष्यातील कर्णधार
झेलबाद झाला गिल, परंतु डीआरएसमध्ये निघाला नो बॉल; नाट्यमय प्रसंगामुळे पंचांवर चिडला विराट
नऊ पैकी ८ सामने जिंकूनही गुजरात टायटन्ससाठी दूर आहे प्लेऑफ, जाणून घ्या गणिते