---Advertisement---

‘धोनीच आहे त्याच्या संघाचा खलनायक’, राजस्थानविरुद्धच्या मंद फलंदाजीमुळे ‘माही’ नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

On: शुक्रवार, मे 20, 2022 11:42 PM
MS-Dhoni
---Advertisement---

शुक्रवारी (दि. २० मे) आयपीएल २०२२मधील ६८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने ५ विकेट्सने खिशात घातला. या विजयासोबतच राजस्थानने प्लेऑफ फेरीत एंट्री केली. मात्र, यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार एमएस धोनी मंद खेळीमुळे चांगलाच ट्रोल झाला. धोनीच्या खराब फलंदाजीवर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

झाले असे की, या सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईने ६ विकेट्स गमावत १५० धावा केल्या. चेन्नई संघाच्या धावसंख्येत वाढ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीला वेगवान खेळी करता आली नाही. धोनीने फक्त २६ धावांचे योगदान दिले. या धावा करण्यासाठी त्याने २८ चेंडूंची मदत घेतली. दुसरीकडे मोईने अली याने जबरदस्त फटकेबाजी करत ५७ चेंडूत ९३ धावा चोपल्या. विशेष म्हणजे, अलीने १९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे धोनीची सावकाश फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी धोनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नेटकऱ्यांचे ट्वीट्स
एका युजरने ट्वीटमध्ये फोटो शेअर करत म्हटले की, “गोष्ट समजून घे भावा, धोनी डाव सांभाळत होता.”

https://twitter.com/IamAyushSingh24/status/1527677402582618112

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “माझ्या नजरेत धोनी या कसोटी खेळींमुळे उरला सुरला सन्मानही गमावत आहे.”

https://twitter.com/Vedant_thereal/status/1527677363328122883

आणखी एक युजर म्हणाला की, “त्याच्याच संघात जर कोणी खलनायक असेल, तर तो एमएस धोनी आहे. प्रत्येक वेळी सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.”

https://twitter.com/mukesh177/status/1527678021368356864

https://twitter.com/gaganhindi/status/1527677336694378496

सामन्याचा आढावा
चेन्नई सुपर किंग्स संघाने दिलेल्या १५१ धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्स संघाने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत पार केले. या विजयामुळे राजस्थानने थेट लखनऊला मागे टाकत पहिल्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले. आता पहिला क्वालिफायर सामन्यात राजस्थान संघ गुजरात टायटन्सविरुद्ध २४ मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये भिडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---