आयपीएल २०२२ ही देशांतर्गत सर्वात मोठी स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात खेळवली जाणार आहे. यासाठी मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नविन संघांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे लिलावाच्या पहिल्या दिवशी या १० संघांमध्ये मोठे खेळाडू खरेदी करण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. १५ व्या हंगामासाठी प्रियम गर्गला सनरायझर्स हैदराबादने २० लाखांना तर सरफराज खान आणि अश्विन हेब्बरला दिल्ली कॅपिटल्सने २०-२० लाखांना विकत घेतले आहे.
प्रियम गर्गला सनरायझर्स हैदराबादने २० लाख रुपयांना खरेदी केले असून त्याची मूळ किंमत सुद्धा २० लाखच होती. प्रियम गर्ग हा फलंदाज असून तो मागील दोन वर्षांपासून हैद्राबाद संघाचा भाग होता. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. २०२० मध्ये त्याने एकूण १४ सामने खेळले आहेत. आणि १४.७७ च्या सरासरीने १३३ धावा केल्या. २०२१ मध्ये त्याला फक्त ५ सामने खेळण्याची संधी मिळाली होती आणि यावेळी त्याने एकूण ७२ धावा केल्या होत्या.
२४ वर्षीय सरफराज खानला दिल्ली कॅपिटल्स संघाने २० लाखांना खरेदी केले आहे. सरफराज आतापर्यंत पंजाब किंग्जकडून खेळला आहे. त्याने २०१४ आणि २०१६ मध्ये भारतीय १९ वर्षाखालील संघांचे प्रतिनिधित्व केले होते. तो मुख्यतः फलंदज आहे.
26 वर्षीय अश्विन हेब्बरला दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्या मूळ किमतीला म्हणजेच 20 लाखांना विकत घेतले आहे. अश्विन हेब्बर हा अष्टपैलू खेळाडू आहे. अश्विन २०१८-१९ विजय हजारे ट्रॉफीमध्ये आंध्रप्रदेशसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ८ सामन्यांमध्ये २९९ धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपीटल्सने वाॅर्नरला सुद्धा संघात घेतले आहे. संघाने मागील ४ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे.
या लिलावात सर्व संघांनी खेळाडू विकत घेतले असले तरी मैदानात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘सुपरफास्ट मावी’ पुन्हा कोलकाताचा ‘नाईट रायडर’; तब्बल ‘इतक्या’ रकमेची लागली बोली (mahasports.in)
राहुल नाम तो सुना होगा! ९ कोटींची घसघशीत कमाई करत तेवतिया बनला ‘या’ संघाचा भाग (mahasports.in)