---Advertisement---

व्याजासकट परतफेड! आरसीबीच्या ‘या’ पठ्ठ्याने घेतला सूड, गोलंदाज असूनही रसेलला ठोकले २ षटकार

On: गुरूवार, मार्च 31, 2022 5:08 PM
Shahbaz Ahmed,Virat Kohli,
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये फक्त धावांचा खेळ नाही तर वार-पलटवार सुद्धा पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग बुधवारी (३० मार्च) झालेल्या राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात आरसीबीने केकेआरला ३ विकेट्सने पराभूत केले आहे. संघाच्या सामन्याबरोबरच दोन खेळाडूंमध्ये सुद्धा सामना पाहायला मिळाला. हा सामना झाला आरसीबीच्या शहबाज अहमद आणि केकेआरच्या आंद्रे रसलमध्ये पाहायला मिळाला. याची सुरुवात आंद्रे रसलपासून झाली आणि त्याचा शेवट अहमदने केला. 

आंद्रे रसल आणि शहबाज अहमद यांच्यामध्ये षटकारांचा सामना पाहायला मिळाला. पहिल्यांदा खेळताना आंद्रे रसलने जेवढे षटकार शहबाजच्या चेंडूवर लगावले, तेवढेच षटकार शहबाजने आंद्रे रसलच्या चेंडूवर ठोकले. केकेआरच्या डावात आंद्रे रसलने शहबाजच्या सलग २ चेंडूंवर २ षटकार लगावले होते. हे १३ व्या षटकाच्या दूसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर पाहायला मिळाले. रसलने १८ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या, त्यांपैकी दोन षटकार तर त्याने शहबाजच्या चेंडूवर लगावले.

जेव्हा शहबाज फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याने देखील रसलची बरोबरी केली. त्याने १३ व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग षटकार लगावले. हे षटकार त्याने रसलच्या चेंडूवर ठोकले. त्याने सुद्धा तीन षटकार लगावले, त्यांपैकी २ रसलच्या चेंडूवर लगावले.

https://twitter.com/RCBTweets/status/1509463010154356737?s=20&t=Gf0zEtg1JCMLhVEeiHP_ow

गोलंदाजीत या दोन्ही खेळाडूंनी समान कामगिरी केली आहे. दोघे सुद्धा संघासाठी विकेट घेऊ शकले नाहीत. शहबाजने १ षटकात १६ धावा दिल्या तर रसलने २.२ षटकात ३६ धावा दिल्या. फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना १२८ धावा केल्या. त्यानंतर आरसीबीने १९.२ षटकातच हे लक्ष्य गाठले. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि दूसऱ्या चेंडूवर चौकार लगावत हा सामना जिंकला. तसेच हसरंगाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

विजयाचं खातं उघडण्यासाठी पलटणला ‘मास्टर ब्लास्टर’कडून महत्त्वाच्या टिप्स, मुंबई इंडियन्सने शेअर केला Video

हात आहे की हातोडा? रसेलने आरसीबीविरुद्ध लगावलेला षटकार पाहून तुम्हीही असेच म्हणाल, पाहा व्हिडिओ

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची १९व्या षटकात ‘मोठी’ चूक, गमावला हाताशी आलेला सामना!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---