मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात सोमवारी (४ एप्रिल) १२ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होणार आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात आत्तापर्यंत हैदराबादने एकच सामना खेळला आहे, तर लखनऊने दोन सामने खेळले आहेत.
हैदराबादने त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला होता, ज्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच लखनऊने आत्तापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांपैकी त्यांना पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला, तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्यांनी विजय मिळवला.
असे असू शकतात संभावित संघ
केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाला दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमनाची अपेक्षा असेल. त्यांच्या संभावित प्लेइंग इलेव्हनबाबत (SRH Predicted XI) बोलायचे झाल्यास कर्णधार विलियम्सन युवा अभिषेक शर्मासह सलामीला उतरू शकतो. तसेच राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन यांना मधली फळी सांभाळावी लागणार आहे, तर अष्टपैलू म्हणून अब्दूल सामदला वॉशिंग्टन सुंदरसह संधी मिळू शकते. तसेच रोमारिया शेफर्डही त्यांना साथ देऊ शकतो. याबरोबरच गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिकवर असून शकते.
आयपीएलमध्ये नवा असलेला एक संघ म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (LSG Predicted XI) विचार करायचा झाल्यास कर्णधार राहुलसह यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डी कॉक सलामीला उतरू शकतो. तसेच मधल्या फळीची जबाबदारी मनिष पांडे, एव्हिन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी यांच्यावर असून शकते. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर संघात स्थान मिळवू शकतात. तर गोलंदाजीची जबाबदारी रवी बिश्नोई, दुश्मंता चमिरा आणि अवेश खान यांच्यावर असू शकेल.
आमने-सामने
लखनऊ सुपर जायंट्स हा संघ स्पर्धेतील नवीन संघ असल्याने त्यांनी यापूर्वी सनराझर्स हैदराबाद संघाशी सामना खेळलेला नाही.
हवामान आणि खेळपट्टी
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants) यांच्यात होणारा सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी (DY Patil Sports Academy Mumbai) येथे होणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी, अशा दोन्ही विभागांना मदतगार आहे. तसेच या सामन्यावेळी मुंबईतील वातावरण उष्ण राहिल. तापमान साधारण ३१ डीग्री सेल्सियसच्या आसपास असेल. तसेच ५३ टक्के आद्रता असेल, तर साधारण ताशी ११ किमी वेगाने वारा वाहील.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) हैदराबाद विरुद्ध लखनऊ (SRH vs LSG) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना ४ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
सनरायझर्स हैदराबाद संघ: केन विलियम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, अब्दुल सामद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, श्रेयस गोपाल, जगदीशा सुचित, ग्लेन फिलिप्स, शशांक सिंग, रविकुमार समर्थ, विष्णू विनोद, प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, फजलहक फारुकी, मार्को जेन्सेन, सौरभ दुबे.
लखनऊ सुपर जायंट्स संघ: केएल राहुल (कर्णधार), क्विंटॉन डी कॉक (यष्टीरक्षक), मनिष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, दुश्मंथा चमीरा, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान, शाहबाज नदीम, कृष्णप्पा गॉथम, अंकित राजपूत, मोहसीन खान, करण शर्मा, मयंक यादव, काइल मेयर्स, मनन वोहरा.
महत्त्वाच्या बातम्या –
एकदाच खेळले पण टिच्चून खेळले! आयपीएल इतिहासातील केवळ एक सामना गाजवणारे भारतीय खेळाडू
क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन