आयपीएल २०२२ ची सुरुवात राजस्थान रॉयल्ससाठी चांगली झाली आहे. त्याच्या पहिल्या सामन्यात राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला ६१ धावांनी धूळ चारली. हा सामना मंगळवारी (२९ मार्च) पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये खेळला गेला. विजायानंतर राजस्थानचा कर्णधार आणि युवा फलंदाज संजू सॅमसनने स्वतःची खास प्रतिक्रिया दिली. सॅमसनने यावेळी विजयामध्ये मुख्य भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकांचेकी कौतुक केले.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्धणार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने मर्यादित २० षटकात आणि ६ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १४९ धावा करू शकला. परिणामी सामन्यात राजस्थानने ६१ धावांनी विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या मते संघाचे प्रशिक्षक कुमार संगकारामुळे (Kumar Sangakara) त्याला खूप मदत मिळाली आहे.
विजायानंतर तो म्हणाला की, “मला वाटते की, आम्ही जसा विचार केला होता, त्यापेक्षा खेळपट्टी वेगळी होती. खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती, जसे की तुम्ही एखादा कसोटी सामना खेळत असाल. संघाच्या विजयात योगदान देऊन आनंद होत आहे. मी माझ्या फिटनेसवर काम केले. मी धावा करण्यासाठी योग्य संधी निवडल्या. खेळपट्टीवर वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. संगकारासारख्या लिडर्समुळे मला खूप मदत मिळाली. योग्य बाजू निवडण्यासाठी तुम्हाला क्रिकेटविषयी खूप ज्ञान असावे लागते. या हंगामात आमचे खूप मोठी स्वप्न आहेत. आमचे मालक आमची खूप काळजी घेत आहेत. आमच्याकडे खूप चांगली बेंच स्ट्रेंथ आहे आणि आम्ही एका वेळी एका सामन्यावर लक्ष देऊ.”
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या पहिल्या विजयासह एक खास विक्रमही केला आहे. आयपीएल २०२२ सुरू झाल्यापासून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसत आहे आणि प्रथम गोलंदाजी केलेल्या संघाला विजय देखील मिळाला आहे. परंतु, राजस्थान आणि हैदराबादच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेला संघ विजयी ठरला. राजस्थान आयपीएल २०२२ मधील प्रथम फलंदाजी करून विजय मिळवणारा पहिला संघ बनला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियन महिला ९ व्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पराभूत
Video: विटांच्या वेगवेगळ्या रचना करताना दिसला चेन्नई संघ, धोनी-जडेजाचाही उपक्रमात सहभाग
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही