---Advertisement---

SRH vs RR: पुण्याच्या मैदानात हैदराबाद-राजस्थान आमने-सामने; विलियम्सनचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, पाहा संघ

On: मंगळवार, मार्च 29, 2022 7:20 PM
Kane-Williamson-and-Sanju-Samson
---Advertisement---

पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली असून आता पाचवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (२९ मार्च) झाला. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे झाला. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली. त्यापूर्वी ७ वाजता नाणेफेक झाली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादच्या अंतिम ११ जणांच्या संघात विलियम्सनसह निकोलस पूरन, एडेन मार्करम आणि रोमारियो शेफर्ड या चार परदेशी खेळाडूंना संधी मिळाली. तसेच राजस्थान रॉयल्सने जोस बटलर, नॅथन कुल्टर-नाईल, ट्रेंट बोल्ट आणि शिमरॉन हेटमायर या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली. तसेच राजस्थान रॉयल्स संघाकडून ७ खेळाडूंचे पदार्पण झाले.

या सामन्यापूर्वी या दोन संघांमध्ये १५ सामने झाले होते. यातील ८ सामने हैदराबादने आणि ७ सामने राजस्थानने जिंकले होते.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा.

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियम्सन (कर्णधार), निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, अब्दुल सामद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

महत्त्वाच्या बातम्या – 

नव्या कर्णधाराचं चहलकडून तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘रोहित भारताला टी२० विश्वचषक जिंकून देईल’

मोठी बातमी! सेमीफायनलच्या एक दिवस आधीच वेस्ट इंडिजला झटका; ‘या’ अनुभवी गोलंदाजाला कोरोनाची लागण

‘माझी आई माझ्याशी २७ वर्षे खोटं बोलली’, असं का म्हणाला केएल राहुल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---