इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघामध्ये समाविष्ट असलेला बेसिल थम्पीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात ४ षटके टाकली आणि ३५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो मुंबईच्या चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण करणारा बसिल थम्पीने या सामन्यातील शानदार प्रदर्शनाचे श्रेय जगातील उत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला दिले.
मुंबई इंडियन्स डाॅट काॅमशी बोलताना तो म्हणाला, “हा खरंच खूप चांगला अनुभव होता. मी दोन वर्षांनंतर आयपीएल खेळण्यासाठी खूप उत्साहित होतो. मला खूप अभिमान वाटत आहे आणि माझा उत्साह यामुळे दुप्पट झाला की, मी मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे.”
वेगवान गोलंदाजांसाठी ब्रेबॉर्न खेळपट्टीवर फलंदाजांना जलद बाद करण्याची गोलंदाजांची योजना यावेळी चांगली चालली. यावर थम्पी म्हणाला, “आमच्याकडे काही खास फलंदाजांसाठी योजना होत्या. आम्ही याबाबत संघात मीटिंगमध्ये चर्चा केली. मी याच योजनांचे पालन मैदानात केले आणि त्यामुळे मला याचा खूप फायदा झाला.”
मुंबई संघात खेळल्यामुळे तो जसप्रीत बुमराहच्या खूप जवळ आला आणि या दोन गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाजीवर चर्चासुद्धा झाली. बुमराहबाबत बोलताना तो म्हणाला, “बुमराहसोबत खेळणे आणि त्याच्यासोबत बोलणे ही एक वेगळीच गोष्ट आहे. मी त्याच्याकडून शिकलो आहे की, तो सामना कशापद्धतीने पाहतो आणि वेगवेगळ्या परिस्थीतींमध्ये कसा हाताळतो. त्यामुळे मला खूप मदत मिळाली.”
मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबतसुद्धा थम्पीचे चांगले संबंध आहेत. रोहितला थम्पी प्रेमाने चेट्टा असे म्हणतो. चेट्टा हा मल्याळम शब्द असून त्याचा अर्थ भाऊ होतो. तो म्हणाला, “मी संपूर्ण सामन्यादरम्यान खूप सहज होतो, कारण चेट्टा एक असा कर्णधार आहे, जो संघातील खेळाडूंना समजून घेतो. तो संघात मला माझी भूमिका निभावण्यासाठी खूप मदत करतो, मी यासाठी त्याचा आभारी आहे.”
मुंबई इंडियनने आयपीएल २०२२ मध्ये पहिला सामना दिल्ली संघाविरुद्ध खेळला आहे, ज्यामध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएलच्या सुरुवातीलाच गंटागळ्या खाणाऱ्या सीएसकेबद्दल ऑसी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला…
दिल मिल गये..! धमकीपर्यंत गेलेले वैर विसरून मित्र बनले कृणाल-दिपक, चेन्नईविरुद्ध आला प्रत्यय
धोनीने नेतृत्व सोडताच पलटले चेन्नईचे नशीब! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की