इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम नुकताच पूर्ण झाला. या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपली चमक दाखवली. यातील अनेक खेळाडू असे आहेत, जे आजही भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी उत्सुक आहेत. या लेखातून आपण त्याच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.
१. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi)
रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीने यंदाच्या हंगामात हैदराबादसाठी खेळताना आपली छाप सोडली आहे. त्रिपाठीने या हंगामात १४ सामन्यांत ३७.५५च्या सरासरीने आणि १५८.२३च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडूंच्या संघात त्रिपाठी सलामीवीर म्हणून अगदी योग्य ठरतो.
२. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma)
राहुल त्रिपाठीला साथ द्यायला त्याच्याच आयपीएल संघातील आणि यंदा सलामीवीर म्हणून सर्वांच्या कौतुकाचा विषय बनलेल्या अभिषेक शर्मा योग्य ठरेल. अभिषेकने यावर्षी १४ सामन्यात ३०.४३च्या सरासरीने आणि १३३.१२च्या स्ट्राईक रेटने ४२६ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. अभिषेकची खास गोष्ट म्हणजे तो कधीही जलद फलंदाजी करू शकतो. सावध फलंदाजीसोबतच अभिषेक लांब षटकारही अगदी सहज मारू शकतो.
३. रजत पाटीदार (Rajat Patidar)
बेंगलोरसाठी बदली खेळाडू म्हणून आलेल्या रजत पाटीदारने आता बंगलोरच्या संघात पुढील वर्षासाठी संघात आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. शिवाय एलिमिनेटर सारख्या महत्त्वपूर्ण सामन्यात रजतने लगावलेले शतक त्याच्या खेळातील संयम दाखवते. त्यामुळे संघात महत्त्वपूर्ण अशा तिसऱ्या स्थानावर रजतचा समावेश होऊ शकतो. त्याने आयपीएल २०२२मध्ये ८ सामन्यात ७ डावात फलंदाजी करताना ५५.५०च्या सरासरीने आणि १५२.७५च्या स्ट्राईक रेटने ३३३ धावा चोपल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
४. तिलक वर्मा (Tilak Varma)
मुंबईसाठी यंदाचा हंगाम वाईट असला, तरी तिलक वर्मासारखा युवा खेळाडू सापडल्याने संघ आनंदी असेल. तिलकने यंदाच्या हंगामात १४ सामन्यात ३६.०९च्या सरासरीने आणि १३१.०२च्या स्ट्राईक रेटने ३९७धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
५. जितेश शर्मा (Jitesh Sharma)
पंजाब किंग्जसाठी यष्टीरक्षक आणि फलंदाजाची भूमिका बजावणाऱ्या जितेश शर्मा अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत स्थान निर्माण केले आहे. त्याने १२ सामन्यात २९.२५च्या सरासरीने आणि १६३.६३च्या स्ट्राईक रेटने २३४ धावा केल्या. याशिवाय त्याने यष्टीरक्षणातही आपले कौशल्य दाखवून दिले. जितेशने धोनीला काही सेकंदात यष्टीचीतकरून पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. याशिवाय जितेशने विकेटच्या मागे काही शानदार झेलही घेतले.
६. रिंकू सिंग (Rinku Singh)
कोतकातासाठी यंदा हिरो ठरलेल्या रिंकू सिंगचा समावेश देखील या संघात करता येऊ शकेल. रिंकूल जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने आपली चमक दाखवून दिली आहे. रिंकूने एका सामन्यात निर्णायक ४५ धावांची खेळी करत कोलकाताला विजयापर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे संघात फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी रिंकूचा समावेश केला जाऊ शकतो. त्याने ७ सामन्यात ३४.८०च्या सरासरीने आणि १४८.७१च्या स्ट्राईक रेटने १७४ धावा चोपल्या आहेत.
७. राहुल तेवतिया (Rahul Tewatia)
रिंकू सिंग याला जोड म्हणून आक्रमक फलंदाजी आणि वेळ प्रसंगी गोलंदाजी करणाऱ्या राहुल तेवतियाला संघात स्थान आहे. राहुल तेवतियाने या हंगामात फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने १६ सामन्यांच्या १२ डावात ३१च्या सरासरीने आणि १४७.६१च्या स्ट्राईक रेटने २१७ धावा केल्या. विशेष म्हणजे अनेक सामन्यांत शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.
८. आर साई किशोर (R Sai Kishor)
फिरकीपटू साई किशोरने गुजरातसाठी यंदा चांगली कामगिरी केली. त्याने ५ सामन्यांत ६ बळी घेतले आहेत. यादरम्यान त्यांचा इकॉनॉमी रेट ७.५६ राहिला. ७ धावांत २ बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती. साईकिशोर कोणत्याही फलंदाजाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे एक फिरकीपटू म्हणून संघात त्याला समाविष्ट केले जाईल.
९. उमरान मलिक (Umran Malik)
यंदाच्या आयपीएलमधून भारताला मिळालेला हिरा म्हणजे उमरान मलिक. आपल्या वेगाने कोणत्याही फलंदाजाला शरण आणणाऱ्या उमरानला संघात निश्चित स्थान आहे. उमरानचे नाव सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी२० मालिकेसाठी आले असले, तरी त्याने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्याने १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या आहेत. मुंबईविरुद्ध २५ धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.
१०. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh)
पंजाब किंग्जचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पॉवरप्ले आणि शेवटच्या षटकांत शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपने स्विंगने अनेक फलंदाजांना अडचणीत आणले. त्याने १४ सामन्यात १० विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट ७.७० होता. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ३७ धावांत ३ बळी घेणे होय. अर्शदीपला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले असून त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.
११. मोहसिन खान (Mohasin Khan)
लखनऊ सुपर जाएंट संघाचा डावखुरा जलद गतीचा गोलंदाज मोहसिन खानचा देखील या संघात समावेश होऊ शकतो. मोहसिनने या हंगामात आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. या मोसमात त्याने ९ सामन्यांत १४ बळी घेतले. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट केवळ ५.९६ होता. मोहसिनची स्विंग गोलंदाजी ही त्याची ताकद आहे आणि अनकॅप्ड प्लेइंग ११मध्ये तो स्ट्राईक गोलंदाज म्हणून कायम राहील.
दरम्यान, या संघातील अनेक खेळाडू लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसतील अशी आशा आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मुंबई संघात निवड होणे वेगळे आणि…’, अर्जुनला एकही सामना न खेळण्याबाबत प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
पदार्पणातील पहिल्याच षटकात केन विलियम्सनची विकेट काढणारा मॅथ्यू पॉट्स नक्की आहे तरी कोण?
वय वाढलं, पण धार गेली नाही! जेम्स अंडरसनने न्यूझीलंडच्या ४ विकेट्स घेत नावावर केला भीमपराक्रम