मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहेत. मुंबईने आतापर्यंत ५वेळा, तर चेन्नईने ४वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. मात्र, हे दोन्ही संघ आयपीएल २०२२मध्ये संघर्ष करताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी हा हंगाम कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. मुंबई संघ सलग ५ सामन्यातील पराभवासह गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे चेन्नई शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध विजय मिळवत ५पैकी १ सामना जिंकण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे चेन्नईनेदेखील सलग ४ सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. अशात माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने चेन्नई आणि मुंबईच्या कामगिरीबद्दल वक्तव्य केले आहे.
दोन्ही संघांच्या गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिलीये. या संघांकडे चांगली कामगिरी करणारे गोलंदाज आहेत. मात्र, ते फॉर्ममध्ये नाहीयेत. चेन्नईच्या ताफ्यात पूर्ण नवीन गोलंदाज आहेत. चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. त्याने संघाला नेहमीच सुरुवातीच्या षटकात यश मिळवून दिले आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1514304350180429824?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1514304350180429824%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-ipl-2022-virender-sehwag-says-let-the-rich-teams-be-at-the-bottom-chennai-super-kings-and-mumbai-indians-look-good-at-the-end-of-the-table-6262341.html
चेन्नई आणि मुंबईची सध्याची कामगिरी पाहता असेही होऊ शकते की, या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने चेन्नई आणि मुंबई संघांबद्दल आपले मत मांडले आहेत. तसेच तो म्हणाला आहे की, हे दोन्ही संघ गुणतालिकेत खालच्या स्थानावर चांगले दिसतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
माध्यमांशी बोलताना दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार सेहवाग म्हणाला की, “मी आधीच सांगितलं होतं, श्रीमंत संघांना सर्वात खालीच राहू द्या. चेन्नई आणि मुंबई हे संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर चांगले दिसतात. त्यांचे जिंकणे कठीण दिसते. मला नाही वाटत की, सूर्यकुमार यादवला माहिती होते की, शेवटचे षटक ओडियन स्मिथ किंवा लियाम लिविंगस्टोन टाकेल. जर त्याला माहिती असते, तर शेवटच्या षटकासाठी २५ धावांपर्यंत सहज पोहोचता आले असते.”
आयपीएल २०२२मधील इतर संघांच्या तुलनेत मुंबईने सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचे किताब जिंकले आहेत. मात्र, असे असूनही त्यांना या हंगामात गुणतालिकेत १०व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.