इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील ११ वा सामना रविवारी( ३ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाबने सीएसकेला ५४ धावांनी पराभूत करत या हंगामातील दूसरा विजय मिळवला आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, सीएसकेला पहिल्या तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर आता कर्णधार रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) आपले मत मांडले आहे.
सामन्यानंतर जडेजा म्हणाला, ‘आम्ही पॉवर प्लेमध्ये खूप विकेट्स घालवल्या. आम्हाला पहिल्या चेंडूपासून गती मिळाली नाही. आम्हाला मजबूत आणि यापेक्षा अधिक चांगले खेळून पुनरागमन करण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे.’
आयपीएलच्या (IPL) १५ व्या हंगामात पहिला सामना सीएसके संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध(KKR vs CSK) ६ विकेट्सने पराभूत झाला, तर दूसऱ्या सामन्यात संघाला लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) ६ विकेट्सने पराभूत केले. दरम्यान, या तिन्ही सामन्यात संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला. त्याने तीनही सामन्यात ०, १ , १ अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागली आहेत.
पण, असे असले तरी सीएसके संघाचा कर्णधार जडेजाने त्याला पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला, ‘आम्हाला त्याला आत्मविश्वास देण्याची गरज आहे, आम्हाला त्याचे समर्थन करण्याची गरज आहे. आम्हाला सर्वांना माहीत आहे की, तो चांगला खेळाडू आहे. आम्ही निश्चितपणे त्याचे समर्थन करु आणि मला विश्वास आहे की तो संघात शानदार पुनरागमन करेल.’
ऋतुराजशिवाय जडेजा अष्टपैलू शिवम दूबे याच्या खेळीबद्दल सुद्धा बोलला आहे. दुबेने पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईसाठी सर्वाधिक ३० चेडूत ५७ धावा केल्या. जडेजा म्हणाला, ‘दूबे एवढी शानदार फलंदाजी करत आहे, आज (३ एप्रिल) देखील त्याने उत्तम कामगिरी केली. त्याला चांगल्या मानसिकतेमध्ये ठेवणे महत्त्वाचे ठरेल. निश्चितपणे आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू, खूप मेहनत करू आणि मजबूत होऊन पुनरागमन करू.
तीन सामने पराभूत झाल्यानंतर सीएसके संघ आता गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर पंजाब किंग्स दोन विजयांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सीएसके संघाने आयपीएलमध्ये ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे. एमएस धोनीने आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि जडेजाला संघाचा कर्णधार बनवले.
महत्त्वाच्या बातम्या-
एकदाच खेळले पण टिच्चून खेळले! आयपीएल इतिहासातील केवळ एक सामना गाजवणारे भारतीय खेळाडू
चेन्नईची IPL इतिहासातील खराब सुरूवात, सलग तिसरा सामना गमावला; पंजाब ५४ धावांनी विजयी