इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात शानदार झाली असून ११ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. पंजाबचा हा दूसरा विजय होता तर सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव होता. तिसरा सामना पंजाब किंग्सने ५४ धावांनी जिंकला. या सामन्यात पंजाबकडून वैभव अरोरा आणि जीतेश शर्माने पदार्पण केले. युवा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज जीतेश शर्माने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वांना प्रभावित केले आहे.
पंजाब किंग्सकडून खेळताना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियममध्ये जीतेशने १७ चेंडूत २६ धावा केल्या, यामध्ये त्याने ३ षटकार ठोकले. तसेच त्याने महेंद्र सिंग धोनी आणि अंबाती रायुडूचा शानदार झेल घेतला. अशा पद्धतीने त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
कोण आहे जीतेश शर्मा?
जीतेश शर्मा आयपीएल २०१६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता, परंतु त्याला एकदाही संघासाठी पदार्पणाची संधी मिळाली नाही. तो विदर्भातील असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसत असतो. पंजाब किंग्सने (PBKS) आयपीएल मेगा लिलावात जीतेशे शर्माने २० लाखांमध्ये खरेदी केले आहे.
या २३ वर्षीय खेळाडूने सैय्यद मुश्ताक अली ट्राॅफी २०२२ मध्ये शानदार कामगिरी केली आहे, त्याने ८ सामन्यांत ५३.८० च्या सरासरीने २१४ धावा केल्या आहेत. सैय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये त्याचा स्ट्राईक रेट २३५.१६ एवढा होता, त्याच्या चमकदार कामगिरीने अनेकांना आकर्षित केले. त्याने विदर्भ संघाला उपांत्य फेरीत पोहचण्यास मदत केली होती.
पंजाब किंग्सने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिला सामना राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोरविरुद्ध ५ विकेट्सने जिंकला. आता संघ पुढचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध ८ एप्रिलला खेळणार आहे, तसेच संघ १३ एप्रिलला मुंबईविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भाई ३डी चष्मा घातलेला का?’, लिविंगस्टोनचा सोपा झेल सोडलेला अंबाती रायुडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर
क्या बात! आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्यासाठी लिविंगस्टोन हवेत झेपावला, फलंदाजही बघतच राहिला
चेन्नईकडून पहिल्या ३ सामन्यात घोर निराशा, ‘त्या’ मॅच विनर खेळाडूची आठवण काढत जडेजा म्हणाला…