रविंद्र जडेजा याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल २०२२ ची सुरुवात खराब झाली आहे. संघ आत्तापर्यंत खेळलेले तिन्ही सामने पराभूत झाला आहे. यावर भाराताचा माजी गोलंदाज हरभजन सिंग याने संघाची सर्वात मोठी कमजोरी सांगितली आहे. त्याने संघाच्या अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये संघाला काम करण्याची गरज आहे.
हरभजन सिंग (Harbhajan Singh) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “सीएसकेच्या एक नाही, तर दोन कमजोरी आहेत. पहिल्या ६ षटकात त्यांच्याकडे दीपक चाहरसारखा गोलंदाज नाही. तो त्यांना नव्या चेंडूसह विकेट मिळवून देतो. तसेच पॉवर प्लेनंतर ७ ते १५ षटकांमध्ये एकही फिरकी गोलंदाज नाही, जो संघाला विकेट मिळवून देईल. सीएसकेसाठी आयपीएल २०२२ मध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा गोलंदाजी संघ ठरला आहे.’
हरभजन सिंग ऋतुराज गायकवाडबाबत म्हणाला की, “तो खूप लवकर बाद होत आहे, त्यामुळे एकही मजबूत सलामीवीर नाही. त्यामुळे संघावर अनेक संकटे आहेत. त्यामुळे सीएसकेसारखा संघ आत्तापर्यंत आपले तिन्ही सामने पराभूत झाला आहे, परंतु चेन्नईने पुनरागमन केले आणि जिंकला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.”
सीएसकेला अपयश येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्टार गोलंदाज दीपक चाहरची अनुपस्थिती, जो दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संघात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्याने मागील ३ हंगामात ३२ विकेट्स घेतल्या आहेत. सीएसकेने आयपीएल इतिहासात ४ वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे. मागच्या वर्षी सीएसकेने अंतिम सामन्यात केकेआरला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. यावर्षी संघ लीगमध्ये पुनरागमन करेल की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘काही दिवस असे असतात, जेव्हा मोठे शॉट्स खेळणे…’, सामनावीर ठरलेल्या शुबमन गिलचे वक्तव्य
कोण आहे गुजरात टायटन्सकडून पदार्पण करणारा साई सुदर्शन, ज्याचे आर अश्विननेही केले होते तोंडभरून कौतुक