---Advertisement---

आयपीएलमध्ये जबरदस्त रेकॉर्ड! 26च्या 26 सामन्यात मिळाले वेगवेगळे मॅच विनर, जाणून घ्याच

Venkatesh-Iyer
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेची सुरुवात थाटात झाली. आतापर्यंत 16व्या हंगामातील 26 सामने पार पडले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. राजस्थान मागील हंगामात विजेतेपद पटकावण्यास मुकला होता. यावेळी संघ कोणतीच कसर सोडताना दिसत नाहीये. गुणतालिकेबाबत बोलायचं झालं, तर आतापर्यंत 26 सामने झाले असून दोन संघ असे आहेत, ज्यांनी सहा सामने खेळून चार विजय मिळवले आहेत. राजस्थानव्यतिरिक्त लखनऊ सुपर जायंट्स संघही मजबूत स्तिथीत आहे. नेट रनरेटच्या आधारे संजू सॅमसन याचा संघ केएल राहुल याच्या संघाच्या पुढे आहे.

तब्बल 26 सामन्यात 26 वेगळे सामनावीर
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात एक विचित्र योगायोग पाहायला मिळाला आहे. 26 सामने पार पडल्यानंतर असा एकही खेळाडू नाहीये, ज्याने आपल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर दोनवेळा सामनावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार (Player of the Match) पटकावला आहे. 26 सामन्यात 26 वेगवेगळे खेळाडू सामनावीर बनण्यात यशस्वी ठरले आहेत. अशात, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, या हंगामात सर्व संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंनी बॅट आणि चेंडूमधून चांगलाच दम दाखवला आहे.

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून अनुभवी गोलंदाज राशिद खान आणि साई सुदर्शन हे सामनावीर बनले आहेत. तसेच, पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंग, शिखर धवन आणि नेथन एलिस सामनावीर बनले. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघातील मार्क वुड, निकोलस पूरन आणि कृणाल पंड्या चमकले. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन आणि यशस्वी जयसवाल यांना सामनावीर पुरस्कार मिळाला.

याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या रवींद्र जडेजा, मोईन अली आणि डेवॉन कॉनवे यांना सामनावीर पुरस्कार मिळाला. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर हे खेळाडू सामनावीर बनले. मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि कॅमरून ग्रीन यांना सामनावीर पुरस्कार मिळाला. तसेच, रॉयल चॅलेजर्स बेंगलोर संघाकडून फाफ डू प्लेलिस याला सामनावीर बनण्यात यश आले.

आज मोडणार का हा विक्रम?
आयपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी (दि. 20 एप्रिल) डबल हेडर म्हणजेच दोन सामने आहेत. त्यातील पहिला सामना पंजाब विरुद्ध बेंगलोर संघात आहे. त्यानंतर दुसरा सामना रात्री दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये दिल्ली विरुद्ध कोलकाता संघात पार पडेल. चारही संघांचे सर्वोत्तम खेळाडू आज सर्वोत्तम बनण्यासाठी मैदानात झुंज देतील. अशात 26 सामन्यांनंतरही वेगवेगळे सामनावीर मिळण्याचा कीर्तिमान तुटेल, अशी चाहत्यांना आशा आहे. (ipl 2023 26 matches are played every time different man of the match award given read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानला पराभूत केल्यानंतर राहुलचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘मी कर्णधार म्हणून काहीतरी चुकीचं…’
‘रियान परागमुळेच हारली राजस्थान…’, लखनऊने रॉयल्सचा धुव्वा उडवताच रवी शास्त्रींची तिखट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---