शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेच्या 10व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने दमदार विजय मिळवला. लखनऊने सनरायझर्स हैदराबाद संघाला 5 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात लखनऊ संघाकडून 40 वर्षीय अमित मिश्रा याने पदार्पण केले. या सामन्यात मिश्राने अफलातून कामगिरी केली. त्याने आधी गोलंदाजीतून कमाल केली आणि नंतर खतरनाक क्षेत्ररक्षण करत क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या.
अमित मिश्राने पकडला शानदार झेल
सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डावातील 18वे षटक यश ठाकूर टाकत होता. यादरम्यान राहुल त्रिपाठी 40 चेंडूत 34 धावांवर खेळत होता तेव्हा यशच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला चेंडूच्या वेगाचा अंदाज आला नाही त्यामुळे तो चेंडू लांब मारू शकला नाही. अशात तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमित मिश्रा (Amit Mishra) याने धाव घेत शानदार डाईव्ह मारली आणि अफलातून झेल पकडला. शेवटी क्रीझवर टिच्चून फलंदाजी करणाऱ्या त्रिपाठीला तंबूत परतावे लागले. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
ICYMI – A brilliant diving catch by @MishiAmit ends Rahul Tripathi's stay out there in the middle.#TATAIPL #LSGvSRH pic.twitter.com/uJkjykYlJt
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
अमित मिश्राची गोलंदाजी
अमित मिश्रा याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा खर्च करत 2 धावा घेतल्या. त्याने वॉशिंग्टन सुंदर याला 16 धावांवर, तर आदिल रशीद याला 4 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. वयस्कर खेळाडूंमध्ये सामील असलेल्या अमित मिश्रा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
अमित मिश्राची आयपीएल कारकीर्द
अमित मिश्रा याने त्याच्या कारकीर्दीत 3 संघांकडून खेळला. त्यात दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश होता. आता त्याचा चौथा संघ लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 155 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 168 विकेट्स चटकावल्या आहेत. सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणारा तो चौथा गोलंदाज आहे. अशात आणखी 3 विकेट्स घेताच तो लसिथ मलिंगा (170) याचा विक्रम मोडू शकतो. (ipl 2023 40 years old amit mishra caught amazing catch in lsg vs srh match see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईशी भिडण्याआधीच सीएसकेला मोठा झटका! अष्टपैलू पायाच्या दुखापतीमुळे माघार घेण्याच्या तयारीत
महत्वाच्या सामन्याआधी मुंबईसाठी धोक्याची घंटा! प्रमुख खेळाडूच्या दुखापतीचे संकेत