इंडियन प्रीमिअर लीग 2023चा पहिला टप्पा पार पडला असून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आयपीएल 2023मध्ये अनेक अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले) खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. त्यात रिंकू सिंग, यशस्वी जयसवाल आणि देवदत्त पडिक्कल यांसारख्या युवा खेळाडूंचा बोलबाला सुरू आहे. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये काही खेळाडू असेही आहेत, ज्यांची कामगिरी पाहून ‘जुनं ते सोनं’ असं आपसुकच तोंडात येत आहे. तसेच, काही युवा खेळाडूही आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
मयंक मार्कंडे (Mayank Markande) या युवा खेळाडूने सनरायझर्स हैदराबाद संघासाठी 8 विकेट्स विकेट्स घेतले आहेत. त्याने 6.7च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिरकीपटू सुयश शर्मा (Suyash Sharma) याने कोलकाता संघासाठी खेळलेल्या 5 सामन्यात 7 विकेट्सची कामगिरी केली आहे. त्याला कोलकाताने 20 लाखांच्या मूळ किंमतीत संघात घेतले.
महागड्या खेळाडूंचे खास प्रदर्शन
दुसरीकडे, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाच्या लिलावात सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूंनीही आपल्या संघाचा विश्वासघात केला नाही. पंजाब किंग्स संघाने खेळाडू सॅम करन याला 18.5 कोटी रुपयात ताफ्यात घेतले होते, तर मुंबई इंडियन्स संघाने कॅमरून ग्रीन याला 17.5 कोटी रुपयात ताफ्यात घेतले होते.
हे दोन्ही खेळाडू यावर्षी शानदार लयीत दिसत आहेत. या हंगामात करनने 138च्या स्ट्राईक रेटने 7 सामन्यात 142 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कॅमरून ग्रीन त्याच्या कामगिरीने मुंबईसाठी फायदेशीर ठरत आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इंग्लंडचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड (Paul Collingwood) आणि भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी या दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे.
कमी किंमतीच्या खेळाडूंची मोठी कामगिरी
मात्र, या हंगामात ज्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, ते सर्व खेळाडू कमी किंमतीत संघात सामील झाले आहेत. चेन्नईचा अजिंक्य रहाणे, मुंबईचा पीयुष चावला, गुजरातचा मोहित शर्मा आणि हैदराबादच्या मयंक मार्कंडे या सर्व खेळाडूंना आयपीएल 2023च्या लिलावात मूळ किंमतीत संघात सामील करण्यात आले होते. हंगामाच्या सुरुवातीपूर्वी या खेळाडूंना कोणत्याच संघांनी खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. मात्र, यावेळी या खेळाडूंनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
मोहित शर्मा (Mohit Sharma) याने 3 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. तसेच, त्याने पहिल्या दोन्ही वेळी गुजरातसाठी सामनावीर पुरस्कार पटकावला. याव्यतिरिक्त तो अखेरच्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्या याच्यासाठी सर्वात आवडता गोलंदाज ठरत आहे.
दुसरीकडे, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याविषयी बोलायचं झालं, तर चेन्नईने त्याला 50 लाखांच्या मूळ किंमतीत संघात घेतले होते. या हंगामात रहाणेने सुरुवातीच्या 6 सामन्यात 44.80च्या सरासरीने 224 धावांचा पाऊस पाडला आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 189.83 इतका आहे.
अशाचप्रकारे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असलेला दिग्गज फिरकीपटू पीयुष चावला यानेही 7 सामन्यात 11 विकेट्स चटकावल्या आहेत. त्याने यादरम्यान 7.11च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. (ipl 2023 ajinkya rahane to mohit sharma these cricketers are performing tremendiously well know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Impact Player नियमाबद्दल गावसकर नाराज; फलंदाजांना लाख मोलाचा सल्ला देत म्हणाले, ‘नो फिल्डिंग…’
IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’