आयपीएल (IPL) 2023 मध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनउ सुपर जायंट्स (LSG) संघाचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen-ul-Haq) यांच्यामध्ये मैदानावर वाद निर्माण झाला होता. तर सोबतच गौतम गंभीरशी (Gautam Gambhir) सुद्धा कोहलीची बाचाबाची झाली होती. परंतू, यादरम्यान आता विराट कोहली हा अमित मिश्राच्या निशाण्यावर आहे. अमित मिश्राच्या विधानाने खळबळ उडाली आहे.
2023च्या आयपीएलमध्ये आरसीबी आणि एलसीजी यांच्यातील सामन्यात विराट आणि गंभीर यांच्यात खूप तणावाचे वातावरण होते. पण या घटनेच्या एका वर्षानंतर, दोन्ही दिग्गज खेळाडू आयपीएल 2024 मध्ये एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसले. तर गंभीरला टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आलं आहे, आता कोहली गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसणार आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू अमित मिश्रानं आयपीएल 2023 च्या लढतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
यूट्यूबवर शुभंकर मिश्राशी संवाद साधताना अमित मिश्रानं क्रिकेटमधील अनेक गुपिते उघड केली. आयपीएल 2023 बाबत बोलताना अमित मिश्रा म्हणाला, “विराट सतत आमच्या खेळाडूंना शिवीगाळ करत होता, काइल मेयर्सला शिवीगाळ करत होता, नवीन उल हकला चेंडू देत होता, शिवीगाळ करत होता, लोकांना हात दाखवत होता. अशा अनेक गोष्टी होत्या, ज्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं, पण विराट कोहलीनं तसं केलं नाही.”
अमित मिश्रा म्हणाला, “आयपीएल 2024 मध्ये एका वर्षानंतर गौतम गंभीरनं हे प्रकरण संपवलं, गौतम गंभीर विराट कोहलीकडे गेला आणि त्यानं कोहलीला त्याच्या कुटुंबाची विचारपूस केली. गंभीरनं हे प्रकरण शांत केलं. विराटनं ते शांत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. विराट कोहलीनं हे प्रकरण शांत करायला हवं होतं. तरीही गंभीरनं मोठेपणा दाखवला. विराटनं म्हणायला हवं होतं गौती भाई, जे झालं ते झालं, आता सगळं संपवूया, पण विराटनं तसं काही केलं नाही.”
पुढे बोलताना अमित मिश्रा म्हणाला, ” मी आणि नवीन उल हक फलंदाजी करत होतो, त्यावेळीही विराट सतत नवीनशी बोलत होता. त्यानंतर मी म्हणालो, तू कोणाशी बोलत आहेस, ते तरुण आहेत, गप्प राहा. यानंतर विराट म्हणाला, तू मला का समजावतोस, त्याला समजावून सांग. तो माझ्याशी छान बोलला. मी म्हणालो, तो गप्प आहे. यानंतरही विराट गप्प बसला नाही आणि म्हणत राहिला की त्याला समजवा. तो गैरवर्तन करतोय. यानंतर मी विराटला म्हणालो, ठीक आहे. झालं, तू मोठा खेळाडू आहेस, तो तुझ्या आसपासही नाही. तू त्याच्याशी का भांडतोय? मी एवढंच बोललो.”
महत्त्वाच्या बातम्या-
सुट्टी संपली, कामावर या! टीम इंडियाचा नवा हेडमास्तर गंभीरचा विराट, रोहित अन् बुमराहला मॅसेज
ठरलं…! श्रीलंका दौऱ्यावर हार्दिक पांड्या सांभाळणार टीम इंडियाची धुरा
अमित मिश्राचा कॅप्टन्सीवरुन शुबमन गिलवर हल्लाबोल; म्हणाला, “त्याला नेतृत्व कसं करावं हेसुद्धा माहित नाही…”