जगभरातील क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023 हंगामाची ओढ लागली आहे. त्यापूर्वी आयपीएल 2023चा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी आता फक्त आठवडाभराचा वेळ शिल्लक आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आणि त्याचे प्रक्षेपण कुठे होईल, याबाबत अनेक क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया आयपीएल 2023च्या लिलावाविषयी सर्वकाही.
एकूण किती खेळाडू खेळणार?
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी 405 खेळाडूंची बोली लागेल. यामध्ये 273 खेळाडू हे भारतीय आहेत, तर उर्वरित 132 खेळाडू हे परदेशी आहेत. चार खेळाडू हे सहयोगी देशांचे आहेत. यात एकूण 119 खेळाडू हे राष्ट्रीय संघाकडून खेळणारे आहेत, तर उर्वरित 282 खेळाडू हे राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले आहेत. एकूण 87 खेळाडूंची जागा रिकामी आहे आणि एकूण 30 परदेशी खेळाडूंची जागा रिकामी आहे.
आयपीएल 2023चे प्रक्षेपण (IPL 2023 LIVE Streaming Update)
दिनांक- 23 डिसेंबर, 2022
वेळ- दुपारी 2.30 पासून
ठिकाण- कोची, केरळ
लाईव्ह प्रक्षेपण- जिओ सिनेमा
टीव्हीवर कुठे पाहाल- स्टार स्पोर्ट्स
आयपीएलच्या 10 संघांचे कर्णधार (Captains Name IPL 2023 Full List)
चेन्नई सुपर किंग्स- एमएस धोनी
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत
कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर
पंजाब किंग्स- शिखर धवन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- फाफ डू प्लेसिस
गुजरात टायटन्स- हार्दिक पंड्या
लखनऊ सुपर जायंट्स- केएल राहुल
सनरायजर्स हैदराबाद- अद्याप निश्चित नाही
आयपीएल 2023 लिलाव कुठे होईल?
आयपीएल 2023चा लिलाव केरळच्या कोची शहरात होईल.
आयपीएल 2023चा लिलाव कधी होईल?
आयपीएल 2023चा लिलाव 23 डिसेंबर रोजी होईल.
आयपीएल 2023चा लिलाव किती वाजता सुरू होईल?
आयपीएल 2023चा लिलाव भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल.
कोणत्या टीव्हीवर पाहता येईल आयपीएल 2023चा लिलाव?
आयपीएल 2023च्या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल.
आयपीएल 2023चा लिलाव ऑनलाईन कुठे पाहता येईल?
आयपीएल 2023चा लिलाव ऑनलाईन जिओ सिनेमावर पाहता येईल. (ipl 2023 auction 10 team captains name time date venue know all about here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे बाप! अवघ्या 15 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला ‘हा’ संघ, 5 फलंदाज शून्यावर तंबूत
‘तो हुकमी एक्का बनेल’, बांगलादेशच्या बत्त्या गुल करणाऱ्या स्टार खेळाडूची कार्तिककडून प्रशंसा