---Advertisement---

बेन स्टोक्स चेन्नईमध्ये सामील झाल्यानंतर धोनीची रिऍक्शन आली समोर, एकदा वाचाच

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 2:20 PM
MS Dhoni & Ben Stokes
---Advertisement---

इंडियम प्रीमियर लीग 2023च्या हंगामासाठीचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचिमध्ये पार पडला. यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले. त्याला चेन्नईने 16.25 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले. यावर अनेकांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यातील अतिशय महत्वाची अशी प्रतिक्रिया संघाचा कर्णधार एमएस धोनी याची होती. त्याने स्टोक्सला संघात घेतल्याने आनंद झाला असल्याचे व्यक्त केले आहे.

चेन्नईचे सीईओ (मुख्य कार्यकारी अध्यक्ष) काशी विश्वनाथ यांनी बेन स्टोक्स (Ben Stokes) याला संघात घेतल्याने एमएस धोनी (MS Dhoni) याची काय प्रतिक्रिया होती ते सांगितले आहे. तसेच त्यांनी स्टोक्स हा पुढील कर्णधार असण्याची शक्यताही वर्तवली आहे.

स्टोक्सने 2019चा वनडे विश्वचषक आणि 2022चा टी20 विश्वचषक या आयसीसी स्पर्धांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. याचाच परिणाम म्हणून त्याला आपल्या संघात घेण्यासाठी लिलावामध्ये अनेक संघांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती. त्यामध्ये अखेर चेन्नईने बाजी मारली आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. त्याला खरेदी केल्यानंतर धोनी खूप खूष होता, असे चेन्नईच्या सीईओने म्हटले आहे.

“बेन स्टोक्सला संघात घेण्यासाठी आम्ही खूप उत्साही होतो आणि तो या लिलावामध्ये सहभागी झाला हे अतिशय भाग्याचे ठरले. बेन स्टोक्स नेतृत्वही करू शकतो, मात्र याचा निर्णय धोनीच घेईल. आम्हाला एका अष्टपैलूची आवश्यकता होती आणि तो आम्हाला मिळाला यामुळे धोनी खूपच आनंदी झाला. कायले जॅमिसन दुखापतग्रस्त असल्याने यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी कोणी रस दाखवला नाही, मात्र तो ठिक असल्याने स्टिफन फ्लेमिंगने म्हटले. लिलावानंतर पाहिले तर चेन्नईचा संघ उत्तम वाटत आहे. आता स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यावर लक्ष असेल,”असे विश्वनाथ यांनी क्रिकइन्फोला सांगितले.

या आयपीएल लिलावात इंग्लंडचाच अष्टपैलू सॅम करन याला ऐतिहासिक बोली लावली गेली. त्याला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावामध्ये पहिल्या 10 महागड्या खेळाडूंच्या यादीत स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL 2023 Auction MS Dhoni’s reaction to Ben Stokes

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरलेल्या हैद्राबादने ‘या’ तिघांवरच उधळले 26 कोटी, पाहा संपूर्ण संघ
‘आता तू शर्ट पण काढ’, फुकटचा वेळ घालवणाऱ्या यजमानांच्या फलंदाजावर विराटची आगपाखड; व्हिडिओ पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---