जगभरात अनेक टी20 लीग आहेत. मात्र, या सर्वांमध्ये प्रतिष्ठित आणि सर्वात मोठी टी20 लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीग ओळखली जाते. या स्पर्धेच्या 16व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवशी सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढतच चालली आहे. आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूपासून ते स्पॉन्सर्स म्हणून अनेक व्यावसायिक या लीगशी जोडले गेले आहेत. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी चीअरलीडर्सही असतात. मागील काही हंगामात कोरोनामुळे चीअरलीडर्स सामन्यादरम्यान दिसत नव्हत्या. मात्र, पुन्हा एकदा या हंगामापासून चीअरलीडर्सची एन्ट्री झाली आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेमध्ये परफॉर्म करणाऱ्या काही चीअरलीडर्स (Cheerleaders) या भारतीय आहेत. तसेच, अधिकतर चीअरलीडर्स या विदेशी आहेत. मात्र, यांना मिळणारा पगार असतो तरी किती, असा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींना पडला आहे. चला तर या लेखातून आपण चीअरलीडर्सचा पगार जाणून घेऊयात…
आयपीएलमधून चीअरलीडर्स किती कमावतात?
माध्यमांतील वृत्तांनुसार, चीअरलीडर्स एका आयपीएल सामन्यासाठी 14 हजार ते 17 हजार रुपये घेतात. हा पगार चीअरलीडर्सला प्रत्येक संघ देतात. हा पगार संघांनुसार वेगवेगळादेखील आहे. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यासाठी 12 हजारांहून अधिक रुपये देतात. तसेच, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ चीअरलीडर्सला एका सामन्यासाठी 20 हजार रुपये देतात. विशेष म्हणजे, चीअरलीडर्सला एका सामन्यासाठी सर्वाधिक रुपये देणारा संघ कोलकाता नाईट रायडर्स आहे. केकेआर संघ चीअरलीडर्सला सर्वाधिक 24 हजार रुपये देतो.
सामन्याव्यतिरिक्तही मिळते अतिरिक्त रक्कम
सामन्यानंतरही त्यांना अतिरिक्त रक्कम मिळते. चीअरलीडर्सला परफॉर्मन्सच्या आधारे आणि संघ विजयी झाला, तर बोनस दिला जातो. याव्यतिरिक्त चीअरलीडर्स लक्झरी वस्तूंच्या वापरापासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींचा फायदा घेतात.
आयपीएल चीअर लीडर्सला किती पैसे मिळतात? #Cheerleaders #म #मराठी #IPL #IPL2023
थ्रेड
1/n pic.twitter.com/eHPbzjo1Ij— PaisaPani (@PaisaPani) April 7, 2023
कोणत्या आधारावर होते चीअरलीडर्सची निवड?
चीअरलीडर्सला आयपीएलमध्ये सहजासहजी नोकरी मिळत नाही. त्यांची निवड मूल्यांकन आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाते. एका आयपीएल चीअरलीडर्सकडे डान्सचा अनुभव, मॉडेलिंग आणि गर्दीसमोर परफॉर्म करण्याचा अनुभवही असावा लागतो. (ipl 2023 cheerleaders income surprising for you they earn a lot of money each match know here)
https://youtube.com/shorts/dpbIEC5Q-Rc?feature=share
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डेथ ओव्हर्समध्ये ‘हा’ चेंडू गोलंदाजांचे सर्वात मोठे हत्यार, प्रशिक्षक ब्रावोची मोठी प्रतिक्रिया
एका मैदानात दोन किंग! ईडन गार्डनवर विराट-शाहरुखने केलेला डान्स होतोय व्हायरल