आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान पार पडला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात यजमान संघाला चेन्नईने अक्षरशः निष्प्रभ केले. फलंदाजांनी उभारलेल्या विक्रमी धावसंख्येचे गोलंदाजांनी रक्षण करत धावांनी 49 मोठा विजय मिळवून दिला. यासह चेन्नईने पाच विजयांसह गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले.
गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याचा इराद्याने मैदानात उतरलेल्या सीएसकेला ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी 73 धावांची सलामी दिली. ऋतुराजने 35 धावांची खेळी केली. कॉनवेने हंगामातील सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर चेन्नईसाठी खेळणारे दोन मुंबईकर केकेआरवर बरसले. अजिंक्य रहाणे व शिवम दुबे यांनी 36 चेंडूवर 85 धावांची मोठी भागीदारी रचली. दुबेने 21 चेंडूवर 50 धावा केल्या. तर रहाणेने 29 चेंडूवर नाबाद 71 धावा करताना 6 चौकार व 5 षटकार ठोकले. यासह चेन्नईने हंगामातील सर्वात मोठी 235 धावसंख्या उभी केली.
या धावांचा पाठलाग करताना केकेआरचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकात माघारी परतले. कर्णधार नितिश राणा जम बसल्यानंतर बाद झाला. दुखापतीसह खेळत असलेल्या जेसन रॉय याने चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. 26 चेंडूंवर 61 धावा करत तो माघारी परतला. अखेर रिंकू सिंग याने नाबाद अर्धशतक करत एकाकी झुंज दिली. मात्र त्यांचा डाव 186 पर्यंत मर्यादित राहिला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.
(IPL 2023 Chennai Super Kings Beat Kolkata Knight Riders By 49 Runs Conway Rahane Dube And Bowlers Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिन्नास्वामीवर आरसीबीचा पुन्हा जलवा! टॉपर राजस्थानला दिली 7 धावांनी मात, फाफ-मॅक्सवेल चमकले
सीएसकेचा नवा मि. कंसिस्टंट! कॉनवेच्या कौतुकास्पद सातत्याने घालाल तोंडात बोटे, आत्तापर्यंत गाजवलाय हंगाम