इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना सायंकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मुंबईला या सामन्यात विजय मिळवून गुणांचे खाते उघडण्याची संधी होती. मात्र, चेन्नईने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर चेन्नईने 7 विकेट्स राखून विजय आपल्या नावे केला.
Impact Player @RayuduAmbati with the winning runs 💥
A 7⃣-wicket win in Mumbai for @ChennaiIPL 💛😎
Scorecard ▶️ https://t.co/rSxD0lf5zJ#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/aK6Npl8auB
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना असलेल्या या हायवोल्टेज सामन्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केले होते. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या चार षटकात त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. रोहित शर्मा व ईशान किशन यांनी संघाला जोरदार सलामी दिली. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तुषार देशपांडे रोहितचा त्रिफळा उडवत संघाला पुनरागमन करून दिले. त्यानंतर मुंबईचे गडी नियमित अंतराने बाद होत गेले. जडेजा व सॅंटनर या फिरकी जोडीने मुंबईची वाताहात केली. टीम डेविडने अखेरीस केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईने 150 धावांची मजल मारली.
विजयासाठी मिळालेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला कॉनवेच्या रूपाने पहिल्या षटकात झटका बसला. मात्र, त्यानंतर ऋतुराज गायकवाड व अजिंक्य रहाणे ही जोडी जमली. हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या अजिंक्यने केवळ 19 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने 27 चेंडूवर 61 धावांची खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने 28 धावा करा चेन्नईचा विजय सोपा केला. अखेर ऋतुराज गायकवाड व रायडू यांनी चेन्नईच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
(IPL 2023 Chennai Super Kings Beat Mumbai Indians By 7 Wickets Ajinkya Rahane Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेवर ‘अजिंक्य’चा झंझावात! झळकावले आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक
मुंबई-चेन्नई ‘काँटे की टक्कर’ सामन्यात सीएसकेच्या खेळाडूचा डोळ्याचे पारणे फेडणारा भन्नाट कॅच! बघा तो व्हिडिओ