आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (20 मे) दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स व प्ले ऑफ शर्यतीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Match 67. Chennai Super Kings won the toss and elected to bat. https://t.co/ESWjX1m8WD #TATAIPL #DCvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
या सामन्यासाठी यजमान दिल्ली संघाने संघात काही बदल केले. युवा फलंदाज यश धूल, अष्टपैलू ललित यादव व चेतन साकरीया यांना संघात संधी दिली गेली आहे. दुसरीकडे आपल्या संघात एकही बदल केला नाही. दिल्ली या सामन्यात विजय मिळवून हंगामाचा यशस्वी निरोप घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, चेन्नईला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. विजय मिळवल्यास त्यांना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी असेल. मात्र, पराभूत झाल्यास त्यांना लखनऊ, मुंबई व बेंगलोर यापैकी एका संघाचा पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रायली रूसो, यश धूल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकरिया, खलील अहमद, एन्रिक नोर्कीए.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा.
(IPL 2023 Chennai Super Kings Won Toss And Elected To Bat First Last Game For Delhi Capitals)