आयपीएल 2023 मध्ये शनिवारी दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होईल. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss and elect to field first against @mipaltan.
Follow the match ▶️ https://t.co/hpXamvn55U #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/ucl96iF7p5
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
स्पर्धा निर्णायक टप्प्यावर आली असताना दोन्ही संघांना गुणतालिकेत मुसंडी मारण्याचे संधी आहे. हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. हंगामात यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला पराभूत केले होते. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सामन्यात उतरली.
नाणेफेकीचा कौल यजमान कर्णधार एमएस धोनी याच्या बाजूने पडला. त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी चेन्नई आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. दुसरीकडे मुंबईने कुमार कार्तिकेय याच्या जागी डाव्या हाताचा फिरकीपटू राघव गोयल याला संधी दिली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्मा याला थोडीशी दुखापत झाल्याने ट्रिस्टन स्टब्स याला हंगामातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, महिश तिक्षणा, दीपक चहर, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल.
(IPL 2023 Chennai Super Kings Won Toss And Elected To Field First)