इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 68वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात 20 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. या दोन्ही संघांचा हंगामातील अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यापूर्वी केकेआर संघ आपल्या तयारीमध्ये व्यस्त आहे. याच सराव सत्रातील अफगाणी फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तो नेट्समध्ये फलंदाजी करताना एका शॉटने स्टंपवर लागलेल्या कॅमेऱ्याला निशाणा बनवल्याचे दिसत आहे.
नितीश राणा (Nitish Rana) याच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाची स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची आशा आता जवळपास संपुष्टात आली आहे. जर संघाने आगामी सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाविरुद्ध मोठा विजय मिळवला, तर त्यांना प्ले-ऑफसाठी क्वालिफाय करण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
मंगळवारी केकेआर (KKR) संघाने सराव सत्रादरम्यानचा एक व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये दिसते की, यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) अष्टपैलू शार्दुल ठाकूर याच्या गोलंदाजीचा सामना करत आहे. यादरम्यान त्याने एक स्ट्रेट ड्राईव्ह शॉट मारला, जो थेट जाऊन स्टंपवर लागला. तसेच, स्टंपवर लागलेला कॅमेराही जमिनीवर पडला.
केकेआरने हा व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “या शूटदरम्यान कोणत्याही कॅमेऱ्याचे नुकसान झाले नाही.”
https://www.instagram.com/p/CsToNYJrOk6/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
विशेष म्हणजे, 21 वर्षीय गुरबाज आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. त्याने 10 सामन्यात 21.70च्या सरासरीने आणि 140च्या स्ट्राईक रेटने 217 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. दुसरीकडे, शार्दुल ठाकूर यानेही 10 सामन्यात फक्त 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, फलंदाजीत त्याने 110 धावांचे योगदान दिले आहे. आता लखनऊविरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ipl 2023 cricketer rahmanullah gurbaz targeted the camera with his dangerous shot see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींनाच नाहीये निवड प्रक्रियेवर विश्वास! लाईव्ह बैठक घेण्याची केली मागणी, फायदेही सांगितले
पराभवानंतर रोहितचा राग उफाळला, ‘या’ खेळाडूंना ठरवले जबाबदार; लगेच वाचा