---Advertisement---

मुंबईविरुद्धच्या धमाकेदार मॅचविनिंग खेळीनंतर विराटचे मोठे भाष्य; म्हणाला, ‘तब्बल चार वर्षांनी…’

On: सोमवार, एप्रिल 3, 2023 10:22 AM
Virat-Kohli
---Advertisement---

रविवारी (दि. 2 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. सालाबादप्रमाणे मुंबई संघाने आपल्या पहिल्या सामन्यावर पाणी सोडले. हा सामना बेंगलोरने 8 विकेट्स शिल्लक ठेवून खिशात घातला. तसेच, स्पर्धेत विजयी सुरुवात केली. या विजयात कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यासोबतच विराट कोहली याचेही मोलाचे योगदान होते. या विजयानंतर माजी कर्णधार विराटने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, संघाला अशाच सुरुवातीची अपेक्षा होती. चार वर्षांनंंतर चिन्नास्वामीमध्ये आयपीएल सामना खेळणे खूपच शानदार ठरेल.

‘घरच्या मैदानावर यापेक्षा शानदार विजय होऊ शकत नाही’
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या शानदार विजयानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने मोठे भाष्य केले. सामन्यानंतर विराट म्हणाला की, “माझ्या मते हा सर्वात जबरदस्त विजय आहे. चार वर्षांनंतर आम्ही आमच्या घरच्या मैदानात पुनरागमन केले. यापेक्षा चांगला खेळच असू शकत नव्हता. 17 षटकांपर्यंत आमची गोलंदाजी चांगली राहिली होती आणि त्यानंतर तिलक वर्माला श्रेय जाते, ज्याने इतकी चांगली फलंदाजी केली.”

पुढे बोलताना विराट म्हणाला की, “आम्हाला हे आव्हान लवकरात लवकर मिळवायचे होते. जेणेकरून आमचा नेट रनरेट चांगला राहील. आम्ही गोलंदाजांवर सातत्याने दबाव बनवला. प्रेक्षकांनीही आम्हाला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला आणि संपूर्ण स्टेडिअम भरले होते.”

https://twitter.com/RCBTweets/status/1642748572155416578

सामन्याचा आढावा
बेंगलोर संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावा केल्या. यावेळी मुंबईकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 46 चेंडूत 84 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हे आव्हान पार करताना बेंगलोरकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (Virat Kohli And Faf Du Plessis) यांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी रचत संघाचा विजय पक्का केला. डू प्लेसिस 73 धावांवर बाद झाला, तर विराटने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी साकारली. तसेच, बेंगलोरने 16.2 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावा करून पार केले. (ipl 2023 cricketer virat kohli reacts on his phenomenal inning and rcb win vs mumbai indians)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट-प्लेसिसच्या आक्रमणात रोहितसेना चारीमुंड्या चीत! मुंबईची पराभवाची 11 वर्षांची परंपरा कायम
आयपीएलचा बादशाह विराटच! ओपनर म्हणून पार केला ‘एवढ्या’ धावांचा टप्पा, कोहलीप्रेमींना वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---