---Advertisement---

चेपॉकवर उडणार धुरळा! सीएसके-मुंबईची दुसऱ्या स्थानासाठी झुंज, पाऊस करणार का खेळ?

On: शनिवार, मे 6, 2023 11:59 AM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये शनिवारी दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होईल. चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत करत हंगामातील यापूर्वी झालेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सचा असेल. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने चेन्नईला चेपॉकवर सर्वाधिक वेळा पराभूत करण्याची कामगिरी केलीये.

उभय संघांमध्ये यापूर्वी पहिला सामना 8 एप्रिल रोजी मुंबई येथे खेळला गेला होता. यामध्ये चेन्नईने एकतर्फी विजय संपादन केलेला. सध्या मुंबई इंडियन्स जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी सलग दोन सामन्यात 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला आहे. दुसरीकडे चेन्नईला सलग दोन पराभव पत्करावे लागलेत. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

मुंबई इंडियन्सला या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा असेल. कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन व टीम डेव्हिड ही स्पर्धेतील सर्वात विध्वंसक फलंदाजी मानली जाते. त्यांना उत्तर देण्यासाठी चेन्नईचा देखील तसाच समतोल संघ उभा असेल.

दुपारी होणाऱ्या या सामन्यात फिरकी गोलंदाज आपला प्रभाव पाडू शकतात. चेन्नईचे फिरकी आक्रमण रवींद्र जडेजा, मोईन अली, महिश तिक्षणा हे सांभाळतील. हा सामना सर्वात महत्त्वाचा असला तरी या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे आता चेन्नई सलग दुसऱ्या सामन्यात गुण वाटून घेणार की, मुंबईला प्रथमच एका गुणावर समाधान मानावे लागेल हे देखील पाहणे रंजक आहे.

(IPL 2023 CSK Against Mumbai Indians At Chepauk Stadium Both Teams Eyeing 2nd Spot)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---