आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (20 मे) दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स व प्ले ऑफ शर्यतीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर होत असला तरी मैदानावर सर्व चाहते चेन्नईला पाठिंबा देण्यासाठी उतरलेले दिसले. त्याचवेळी चेन्नईचा संघ मैदानात पोहोचत असताना, चाहत्यांनी अक्षरशः टीम बसला गराडा घातला.
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वकालीन महान कर्णधार राहिलेला धोनी आपला अखेरचा हंगाम खेळत असल्याचे वृत्त आहे. याबाबत त्याने घोषणा केली नसली तरी तसे संकेत त्याने दिले होते. त्यामुळे या हंगामात तो ज्यावेळी मैदानात उतरला त्यावेळी चाहत्यांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला. चेन्नईतील सर्व सामन्यांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच इतर मैदानावर देखील लोक धोनीसाठी स्टेडियममध्ये येत होते.
CSK team bus gets YELlove welcome in Delhi just before CSK vs DC match. pic.twitter.com/OVLNTDIcMe
— Venkatramanan (@VenkatRamanan_) May 20, 2023
दिल्ली येथील सामन्याआधी चेन्नईचा संघ ज्यावेळी स्टेडियमकडे येण्यासाठी निघाला, त्यावेळी अगदी हॉटेलपासून मैदानापर्यंत ठीकठिकाणी चाहते धोनीला पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेले दिसले. चाहत्यांनी गर्दी केल्याने चेन्नई संघाची टीम बस रस्त्यात उभी राहिलेली दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा सामना चेन्नई संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकल्यास त्यांचे गुणतालिकेतील दुसरे स्थान निश्चित होईल. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची दोनदा संधी मिळेल. मात्र, पराभूत झाल्यास आरसीबी, लखनऊ व मुंबई यांच्यापैकी एका संघाने पराभूत व्हावी अशी प्रार्थना त्यांना करावी लागेल. चेन्नई प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरल्यास त्यांना एक सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
(IPL 2023 CSK Fans Gathered Around Team Bus For MS Dhoni Ahead CSK DC Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
DCvCSK: अखेरच्या साखळी सामन्यात सीएसकेची प्रथम फलंदाजी, दिल्ली विजयी समारोपासाठी सज्ज
IPLमधील वाद थांबेना! एकमेकांना भिडले हेटमायर अन् करन, पंजाब-राजस्थान लाईव्ह मॅचमध्ये मैदानावर पंगा