इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 17 एप्रिल) 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने शानदार प्रदर्शन करत 8 धावांनी विजय मिळवला. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवरील सामन्यात विराट कोहली खास कामगिरी करू शकला नाही. त्याला फक्त 6 धावांवर तंबूत परतावे लागले. यावेळी विराट ज्याप्रकारे बाद झाला, त्याला पाहून स्टेडिअममध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिलादेखील धक्का बसला. तसेच, चाहतेही अवाक् झाले. आता यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
शॉट मारण्याच्या नादात विराट बाद
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट कोहली (Virat Kohli) सलामीला उतरला होता. यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) याने ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून बोलावलेला गोलंदाज आकाश सिंग (Akash Singh) याच्या पहिल्या चेंडूवर विराटने दोन धाव घेतल्या. पुढे दुसऱ्याच चेंडूवर विराटने शानदार चौकार मारला. षटकातील तिसऱ्या चेंडू निर्धाव सुटल्यानंतर तो पुन्हा एकदा बाजूला सरकून चौकार मारण्यासाठी गेला.
चौथ्या चेंडूवर विराट जसा बाजूला झाला, गोलंदाजाने त्याच दिशेला चेंडू टाकला आणि पॅडला लागून चेंडू स्टंपला जाऊन लागला. यावेळी विराट ज्याप्रकारे बाद झाला, ते पाहून चाहत्यांसोबतच पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हीदेखील निराश झाली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.
#IPL2023 #AnushkaSharma @imVkohli @CSKFansOfficial. 😂😂😂😂 pic.twitter.com/bdXLgcIFpc
— Jayaganesh (@JayAbvp) April 17, 2023
https://t.co/TwPUnAMQJs#AtiqueAhmed #ViratKohli𓃵 #viratkholi #AnushkaSharma #Bollywood #IPL2023 #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB #Yogi #YogiAdityanath #NarendraModi https://t.co/TwPUnAMQJs pic.twitter.com/PJHkToDxwh
— Shubham Agrahari (@ShubhamAgr9446) April 17, 2023
RCB Team Loss #AnushkaSharma Reaction 💔 #ViratKohli #RCBvCSK #CSKvsRCB #RCBvsCSK #CSKvRCB pic.twitter.com/bSykeFEYaU
— Vishwajit Patil (@_VishwajitPatil) April 17, 2023
Anushka Sharma after today's match. #RCBvsCSK #RCBvCSK #CSKvsRCB #CSKvRCB #AnushkaSharma pic.twitter.com/J3ntux0IbU
— Vishwajit Patil (@_VishwajitPatil) April 17, 2023
विशेष म्हणजे, विराट कोहली या हंगामात शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 5 सामन्यात 220 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. यादरम्यानच्या त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 82 इतकी आहे.
सामन्याचा आढावा
चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी चेन्नईने 16 धावांवर ऋतुराज गायकवाड याची विकेट गमावली होती. त्यानंतर डेवॉन कॉनवे (83), शिवम दुबे (52) आणि अजिंक्य रहाणे (37) यांनी मोठी खेळी साकारत संघाला 226 धावांपर्यंत पोहोचवले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी अर्धशतक झळकावले. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. बेंगलोरला 20 षटकात 218 धावाच करता आल्या. (ipl 2023 csk vs rcb anushka sharma sad after virat kohli clean bowled reaction goes viral see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाफ अन् मॅक्सवेलचा भीमपराक्रम! विराट-राहुलला पछाडत आरसीबीसाठी रचला भागीदारीचा नवीन रेकॉर्ड
‘कार्तिकसाठी ही मॅच फिनिश करणे हाताचा मळ होता, पण…’, आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधाराचे लक्षवेधी विधान