आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (20 मे) पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर चेन्नईच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत संघाला 3 बाद 223 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना दिल्लीसाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने झुंजार खेळ दाखवला. त्याचवेळी दिल्लीची फलंदाजी सुरू असताना मैदानावर एक मजेदार प्रसंग घडला.
आपला अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीसाठी सुरुवात चांगली राहिली नव्हती. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर त्याने काही शानदार फटके खेळले. दिल्लीच्या डावातील पाचवे षटक सुरू असताना एक मजेदार घटना घडली. दीपक चहर गोलंदाजी करत असताना तिसऱ्या चेंडूवर वॉर्नर याने एक धाव काढली. त्यावेळी जडजाने केलेला थ्रो स्टम्पवर न लागता अजिंक्य रहाणेकडे गेला. त्यावेळी वॉर्नरने पुन्हा एकदा दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रहाणेने त्याला थ्रो करण्याची भीती दाखवली. वॉर्नर क्रिझ बाहेर असल्याचे पाहून त्याने थ्रो देखील केला.
The mind-games have hit a new high here in Delhi 😃#TATAIPL | #DCvCSK | @imjadeja | @davidwarner31
Watch the Warner 🆚 Jadeja battle here 🎥🔽 pic.twitter.com/o5UF6U2sAY
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
हा थ्रो पुन्हा जडेजाकडे पोहोचला. त्यावेळी त्याने वॉर्नरची मजा करताना चेंडू हातात घेत स्टंपवर मारण्याची नक्कल केली. त्याला प्रतिसाद म्हणून वॉर्नरने जडेजा ज्याप्रकारे तलवारबाजीचे ‘स्वॉर्ड सेलेब्रेशन’ करतो तसा जल्लोष केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
या सामन्याचा विचार केल्यास चेन्नईने ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 3 बाद 223 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीसाठी एकटा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा प्रतिकार करताना दिसला. त्याने धावा केल्या. हा सामना धावांनी जिंकत चेन्नईने प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की केली.
(IPL 2023 DCvCSK Funny Banter And Sword Celebration Between Ravindra Jadeja And David Warner)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी एकटा बोर झालेलो…’, ख्रिस गेलने आपल्या खास क्लबमध्ये केले विराटचे स्वागत
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वीबाबत सहाय्यक कोच वॉटसनचे खळबळजनक भाष्य; काय म्हणाला लगेच वाचा