सूर्यकुमार यादव मागच्या वर्षी आपल्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर चांगलाच चर्चेत राहिला. सूर्यकुमार आताही चर्चेत आहे. पण त्याचा खराब फॉर्ममुळे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मंगळवारी (11 एप्रिल) झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शून्यावर विकेट गमावली. मागच्या काही महिन्यांमध्येही त्याची बॅच शांतच राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारला खास सल्ला दिला आहे.
मंगळवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs MI) संघ आमने सामने होते. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला डावातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला. 6 विकेट्स राखून मुंबईने विजय मिळवला. असे असले तरी, मुंबईचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. मुंबईच्या डावातील 16व्या षटकात मुकेश कुमार गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार स्ट्राईकवर आला आणि पहिल्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात कुलदीप यादवच्या हातात झेलबाद झाला.
तत्पूर्वी सूर्यकुमार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेत देखील खुपच सुमार खेळला. मैदानाच्या सर्व दिशेंना षटकार मारण्याची क्षमता असणार सूर्यकुमारचा हा खराब फॉर्म पाहून रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना देखेखील रहावले नाही. अशात त्यांना सूर्यकुमारसाठी खास सल्ला दिला. एका माध्यमाशी बोलताना शास्त्री म्हणाले, “भुयाराच्या शेवटची प्रकार येणार आहे. सूर्यकुमारलाही तो प्रकार लवकरच दिसणार आहे. जेव्हा त्याला हा प्रकार दिसेल, तो पकडून ठेवले आणि जास्तीत जास्त लाभ घेईल. त्यामुळे माझा त्याला असाच सल्ला असेल की, टी-20 क्रिकेट असले तरीही स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे.”
दरम्यान सूर्यकुमारच्या मागच्या 10 डावांचा विचार केला, तर त्याला एकही अर्धशतक करता आले नाहीये. 47 धावांचे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. आयपीएलच्या चालू हंगामात त्याने आरसीबीविरुद्ध 15, तर सीएसकेसोबत 1 धाव करून विकेट गमावली आहे. तर हंगामातील तिसऱ्या सामन्यात गोल्डन डक झाला आहे. तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात सूर्यकुमार अवघ्या 8 धावा करू शकला. त्यानंतर माहितीले एकही कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामने सूर्यकुमार यादव खेळला, पण त्याला एकही धाव करता आली नाही. तिन्ही सामन्यांमध्या त्याने गोल्डन डकवर विकेट गमावली. (Ravi Shastri’s valuable advice to Suryakumar in bad form)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर बीसीसीआयसमोर नमली पीसीबी! वर्ल्डकप सामने खेळण्यासाठी ठेवली केवळ एक अट
पियुष चावला ईज बॅक! ललित यादवचा त्रिफळा उडवत नावावर केला आयपीएलमधील मोठा विक्रम