गतविजेता गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. गुजरातने त्यांचा वैयक्तिक 10वा सामना शुक्रवारी (दि. 5 मे) राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात गुजरात संघाने 9 विकेट्सने दणदणीत विजय साकारला. या विजयाचा हिरो राशिद खान ठरला. राजस्थानला नमवत गुजरातने हंगामातील सातवा विजय साकारला. तसेच, अव्वलस्थान आपल्याकडेच कायम ठेवले. या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला त्यांच्याच घरच्या मैदानात म्हणजेच जयपूर सवाई मानसिंग स्टेडिअममध्ये गुजरात टायटन्स संघाने पराभवाची धूळ चारली. यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “मी राशिद खान याला नूरसोबत काम सांभाळू दिले. मला जास्त काही करायचे नाहीये, मी फक्त सल्ला देतो. त्यांना काय करायचे हे माहिती आहे. आम्ही तेव्हाच चर्चा करतो, जेव्हा गोष्टी व्यवस्थित होत नसतात. राशिद आणि नूर यांच्याविरुद्ध खेळणे सोपे नाहीये.”
For his brilliant bowling display which set up @gujarat_titans' win against #RR, @rashidkhan_19 bags the Player of the Match award 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/tilu6n33sB#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/F8hIRx2EMM
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2023
‘वृद्धिमान साहा सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक’
पंड्याने वृद्धिमान साहा याची प्रशंसा केली. तो म्हणाला की, “मला वाटते, वृद्धि सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे. आम्ही आमचे काम करत आहोत आणि कसलीही चिंता नाहीये. मी आणि आशु पा (आशिष नेहरा) गरज पडेल, तेव्हाच चर्चा करतो. मी मागील सामन्यात निर्णय घेण्यात काही चुका केल्या होत्या, पण शुबमन बाद होण्यापर्यंत माझे अर्धे काम झाले होते. मी चुका स्वीकारताना कचरत नाही.”
सामन्याविषयी थोडक्यात
राजस्थान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 17.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 118 धावाच केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने शानदार फलंदाजी करत तासाभरातच सामना संपवला. गुजरातकडून यावेळी साहा आणि गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र, गिल 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या स्थानी कर्णधार पंड्या उतरला होता. त्याने यावेळी वादळी फलंदाजी केली.
पंड्याने यावेळी 15 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावा चोपल्या. तसेच, साहाच्या 34 चेंडूत 41 धावांचा समावेश होता. अशाप्रकारे गुजरातने 13.5 षटकात 1 विकटे गमावत 119 धावा केल्या आणि सामना 9 विकेट्सने जिंकला. या विजयात राशिद खान याने मोलाचे योगदान दिले. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 14 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, नूर अहमद यानेही 3 षटकात 25 धावा खर्च करत 2 विकेट्स चटकावल्या.
गुजरात संघ या विजयासह 14 गुण पटकावत गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. गुजरातचा पुढील सामना रविवारी (दि. 7 मे) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. (ipl 2023 does not shy away from accepting mistakes skipper hardik pandya said after win against rr)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! IPLमध्ये रोहितच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद, स्वप्नातही म्हणेल ‘नकोच’
आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यापूर्वीच दिल्लीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! ‘हा’ हुकमी एक्का परतला मायदेशी