इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि. 28 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रंगणार आहे. क्वालिफायर 1 सामन्यात सीएसकेने गुजरातला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. त्यानंतर गुजरातनेही दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्यात एन्ट्री केली.
या दोन्ही संघांनी संपूर्ण हंगामात शानदार फलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे.
दोन्ही संघांची शानदार कामगिरी
अंतिम सामन्यात भिडण्यापूर्वी गुजरात आणि चेन्नई संघांनी संपूर्ण आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात अष्टपैलू कामगिरी केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली आहे. या हंगामात एकीकडे गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहिला, तर चेन्नई संघानेही गुणतालिकेतील दुसरे स्थान पटकावले होते.
चेन्नई संघाची मोठी ताकद म्हणजे, त्यांच्याकडे महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यासारखा अनुभवी कर्णधार आहे. तसेच, गुजरातची सर्वात मोठी ताकद ही नव्या दमाचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याचा फॉर्म आहे.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. यापैकी पहिले तीन सामने गुजरातने जिंकले आहेत, तर एक सामन्यात चेन्नईला विजय मिळवण्यात यश आले आहे.
कुठे आणि कधी पाहता येईल अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रसारण?
गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच, लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ऍपवर पाहता येईल. या सामन्याला रविवारी (दि. 28 मे) सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी 7 वाजता नाणेफेक होईल.
उभय संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महीश थीक्षणा
गुजरात टायटन्स
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी (ipl 2023 final gujarat titans vs chennai super kings score today match at narendra modi stadium read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना गमावूनही सूर्यकुमारने मन जिंकले! सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
गिल आणि साराचं बिनसलं? सलामीवीरने शतक ठोकताच समोर आली मोठी माहिती