---Advertisement---

‘तुम्ही सगळी जबाबदारी तिलकवर टाकू शकत नाहीत…’, भारतीय दिग्गजाने मुंबई इंडियन्सला सुनावले खडेबोल

On: मंगळवार, एप्रिल 4, 2023 12:52 PM
Tilak-Varma
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. मुंबईने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध 8 विकेट्सने पराभव पत्करला. या पराभवाचे कारण मुंबईची खराब फलंदाजी ठरली. मात्र, 20 वर्षीय फलंदाज तिलक वर्मा याच्या नाबाद 84 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर संघाने बेंगलोरपुढे एक मोठे आव्हान उभे केले. बेंगलोरकडून सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी वादळी खेळी करत सामना एकतर्फी केला आणि मुंबईला पहिल्या सामन्यात पराभूत केले. अशात भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठान याने तिलक वर्माविषयी मोठे भाष्य केले आहे.

इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला की, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला सर्व जबाबदारी तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यावर टाकू शकत नाहीत. मुंबईच्या फलंदाजांवर टीका करत तो म्हणाला की, “ही स्थिती आलीच नसती. कारण, मुंबई इंडियन्स एक शानदार संघ आहे. रोहित शर्माच्या बॅटमधून धावा येणे बाकी आहे. संघाच्या दोन युवा फलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले नाही आणि त्यांना दाखवावे लागले की, ते शानदार फलंदाजी करू शकतात. मात्र, तुम्ही सर्व जबाबदारी तिलक वर्मावर टाकू शकत नाहीत.”

पुढे बोलताना इरफान म्हणाला की, “जर मुंबई इंडियन्सला या हंगामात चांगली कामगिरी करायची असेल आणि अंतिम 4 संघांमध्ये स्थान मिळवायचं असेल, तर फलंदाजांना फॉर्ममध्ये यावे लागेल. कारण, त्यांच्या गोलंदाजीत तितकी ताकद नाहीये. त्यामुळे त्यांना शानदार फलंदाजीने कमजोर गोलंदाजीचा बचाव करावा लागेल.”

विशेष म्हणजे, यावर्षी मुंबई इंडियन्स संघाकडून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळत नाहीये. मात्र, जोफ्रा आर्चर त्यांच्याकडे मुख्य गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यात सर्व गोलंदाजांविरुद्ध धावा निघाल्या. बेंगलोरने 22 चेंडू ठेवत सामना आपल्या नावावर केला होता. फलंदाजीत ईशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांची बॅट तळपली नाहीये. त्यामुळे संघ सुरुवातीपासूनच दबावात असल्याचे दिसत आहे.

मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध वानखेडे स्टेडिअम येथे होणार आहे. हा सामना शनिवारी (दि. 8 एप्रिल) खेळला जाणार आहे. (ipl 2023 former cricketer irfan pathan on Tilak Varma said this know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या षटकारामुळे महागड्या गाडीवर पडला डेंट, आता मिळणार 5 लाख रुपये; कारण घ्या जाणून
लय भारी! भारताला 28 वर्षांनी चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीचा विजयी षटकार होणार ‘अमर’, एमसीएचा मोठा निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---