शनिवारी (दि. 22 एप्रिल) जगभरात ईद सण साजरा केला जात आहे. ईद हा मुस्लिम समुदायातील लोकांसाठी सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. सद्या आयपीएल 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनीही ईद सण साजरा केला. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
गुजरात टायटन्स संघाच्या खेळाडूंनी साजरी केली ईद
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संघाचे खेळाडू एकत्र ईद साजरा करताना दिसत आहेत. गुजरात संघाकडून खेळत असलेल्या राशिद खान (Rashid Khan) आणि नूर अहमद (Noor Ahmad) सध्या आयपीएलसाठी भारतात आहेत. याव्यतिरिक्त संघात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हादेखील आहे. अशात संघात सामील झालेल्या देश-विदेशातील खेळाडूंनी या खेळाडूंसोबत मिळून ईद सण साजरा केला. या व्हिडिओत सर्व खेळाडू एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूपच आवडत आहे. यावर ते वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
विशेष म्हणजे, गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना 3 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. गुजरात संघ सध्या गुणतालिकेत 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात संघाला मागील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून 3 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आता गुजरात संघाचा सामना शनिवारी (दि. 22 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध रंगला.
We finish with 1⃣3⃣5⃣/6️⃣ on the board! 🙌
Time to defend this! 👊#LSGvGT #AavaDe #TATAIPL 2023 pic.twitter.com/oKGGVV0JDy
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 22, 2023
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार पंड्याच्या 66 धावांच्या जोरावर 6 विकेट्स गमावत 135 धावा केल्या. हा सामना जिंकायचा असेल, तर गुजरातला लखनऊ संघाला पराभूत करावे लागेल. (ipl 2023 gujarat titans players celebrated eid heart touching video went viral social media rashid khan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जेव्हा धोनी निघून जाईल, तेव्हा त्याचे महत्त्व कळेल…’, इंग्लंडच्या दिग्गजाची भावूक करणारी प्रतिक्रिया
बीसीसीआयपुढे नमलं पाकिस्तान! आशिया चषकासाठी आला नवीन प्रस्ताव, जाणून घ्याच