आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (13 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना खेळला गेला. मोहली येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला. पुनरागमन करत असलेला गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मागील सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
🚨 Toss Update 🚨@gujarat_titans win the toss and elect to bowl first against @PunjabKingsIPL.
Follow the match ▶️ https://t.co/qDQuP8ecgd #TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/jM5STYICl6
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2023
सलग दोन विजय मिळवल्यानंतर पंजाबला मागील सामन्यात हैदराबादने पराभूत केले होते. तर, गुजरात टायटन्सला केकेआरकडून रिंकू सिंगने केलेल्या ऐतिहासिक खेळीनंतर पराभव पत्करावा लागलेला. या सामन्यासाठी पंजाबने आपल्या संघात फिरकीपटू राहुल चहरच्या जागी रिषी धवन याला संधी दिली. लियाम लिव्हिंगस्टोन पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने बाकावरच राहील. दुसरीकडे गुजरातने विजय शंकरच्या जागी हार्दिक पंड्या व यश दयालच्या जागेवर मोहित शर्मा यांना अंतिम अकरामध्ये सामील केले.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन-
प्रभसिमरन सिंग, शिखर धवन, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, रिषी धवन, कागिसो रबाडा व अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन-
वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, मोहित शर्मा व जोशुआ लिटल.
(IPL 2023 Gujarat Titans Won Toss And Elected To Bowl First Hardik Pandya Makes Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचे अभिनंदन! यॉर्कर टाकून राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्माची पोस्ट व्हायरल
‘धोनी होता म्हणून…,’ सीएसकेला हरवल्यानंतर संदीप शर्माची सीएसके कर्णधाराविषयी काय म्हणाला