रविवारी (दि. 7 मे) आयपीएल 2023 स्पर्धेतील 51व्या सामन्यात गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघ एमेकांपुढे उभे ठाकले होते. या हंगामातील गुणतालिकेत गुजरात अव्वलस्थानी आहे, तर लखनऊ तिसऱ्या स्थानी आहे. अहमदाबाबच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात गुजरात संघ फलंदाजीला उतरला होता. यावेळी गुजरातचा सलामीवीर फलंदाज वृद्धिमान साहा याने तुफान फटकेबाजी करत खास विक्रम नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल मैदानात उतरले. यावेळी साहाने फलंदाजीला येताच पहिल्या षटकात 2 चौकारांसह 10 धावा चोपल्या. त्याची ही फलंदाजी पुढेही कायम राहिली. त्याने झटपट फटकेबाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक साकारले. त्याने पॉवरप्लेमध्ये 23 चेंडूत 54 धावांची खेळी साकारली. या खेळीमुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
FIFTY for Wriddhiman Saha 🙌🙌
A well made half-century by Saha off just 20 deliveries.
His 12th in IPL.
Live – https://t.co/DEuRiNeIOF #TATAIPL #GTvLSG #IPL2023 pic.twitter.com/RQZ7ZLGlrn
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
वृद्धिमान साहाचा विक्रम
साहाने यावेळी 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. अशाप्रकारे तो आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज बनला. या यादीत तो काईल मेयर्स आणि जोस बटलर यांच्यासोबत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी पोहोचला. लखनऊच्या मेयर्सने पंजाब किंग्सविरुद्ध मोहालीत 22 चेंडूत 54 धावांची खेळी साकारली होती. तसेच, राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर यानेही सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 22 चेंडूत 54 धावा केल्या होत्या.
तसेच, यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईत पॉवरप्लेमध्ये 20 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या होत्या. तसेच, यादीत तिसऱ्या स्थानी पुन्हा मेयर्स आहे. त्याने चेन्नईविरुद्ध चेन्नईत 20 चेंडूत 53 धावा चोपल्या होत्या. अशाप्रकारे यादीत साहा आणि रहाणे हे दोघेच भारतीय आहेत. (IPL 2023 Highest individual scores in PP this season)
आयपीएल 2023मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
54*(23) – वृद्धिमान साहा (गुजरात), विरुद्ध- लखनऊ, अहमदाबाद
54(22) – काईल मेयर्स (लखनऊ), विरुद्ध- पंजाब, मोहाली
54(22) – जोस बटलर (राजस्थान), विरुद्ध- हैदराबाद, हैदराबाद
53*(20) – अजिंक्य रहाणे (चेन्नई), विरुद्ध- मुंबई, मुंबई
53(20) – काईल मेयर्स (लखनऊ) विरुद्ध- चेन्नई, चेन्नई
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा खूपच भावूक दिवस, आमच्या बाबांना…’, नाणेफेकीवेळी भाऊ कृणालसमोर हार्दिक इमोशनल
‘रोहितने त्याचे नाव No Hit Man ठेवले पाहिजे’, शून्यावर बाद होताच मुंबईच्या कॅप्टनवर भडकला भारतीय दिग्गज