भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याची ख्याती जगभरात पसरली आहे. धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. मात्र, तरीही त्याची लोकप्रियता जरादेखील कमी झाली नाहीये. धोनीला आज कोणत्याच परिचयाची गरज नाही. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला, तरीही तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सक्रिय आहे. त्याच्याकडे अनेक युवा खेळाडू आदर्श म्हणून पाहतात.
एमएस धोनी (MS Dhoni) सध्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खेळत आहे. यामध्ये तो चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे नेतृत्व करत आहे. नुकताच गुरुवारी (दि. 27 एप्रिल) जयपूर येथे पार पडलेल्या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात 34 धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या राजस्थानचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याने धोनीविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
जुरेल म्हणाला की, त्याला धोनीसोबत खेळताना दबाव जाणवत नाही. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो की, त्याच्या फलंदाजीवेळी धोनी यष्टीरक्षण करत आहे आणि त्याला फलंदाजी करताना पाहत आहे.
धोनीला आदर्श मानतो जुरेल
ध्रुव जुरेल हा भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला आपला आदर्श मानतो. त्याने धोनीबाबत बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी खूप भाग्यवान आहे की, एमएस धोनीसोबत मैदानावर खेळण्याची संधी मिळत आहे. मी लहानपणापासूनच त्यांना खेळताना पाहत आलो आहे.”
‘माझा खूपच आत्मविश्वास वाढतो’
पुढे बोलताना जुरेल म्हणाला की, “धोनीविरुद्ध खेळल्यावर मला कोणत्याही प्रकारचा दबाव जाणवत नाही. उलट मला यामुळे आत्मविश्वास मिळतो. मी यामुळे खूपच प्रेरित होतो की, धोनी माझ्या मागे उभे आहेत आणि मला पाहत आहेत. हे माझ्यासाठी पुरेसे आहे.”
https://twitter.com/rajasthanroyals/status/1650388212525961219
जुरेलने चोपल्या 34 धावा
खरं तर, आयपीएल 2023मध्ये राजस्थानसाठी ध्रुव जुरेल याने एक फिनिशर म्हणून शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने 37व्या सामन्याच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध वादळी फलंदाजी केली. त्याने फक्त 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी साकारली. यावेळी त्याचा स्टाईक रेट हा 226.67 इतका होता. त्याला धोनीनेच धावबाद केले होते.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1651614315663986689
सामन्याविषयी थोडक्यात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर आयपीएल 2023च्या 37व्या सामन्यात राजस्थानने शानदार विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 202 धावा केल्या होत्या. 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 170 धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने हा सामना 32 धावांनी जिंकला. (ipl 2023 i was motivated on seeing dhoni said this young batsman)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘संजूने अनुभवी कर्णधारावर…’, राजस्थानच्या विजयानंतर भारतीय दिग्गजाच्या विधानाने खळबळ; वाचाच
जुनं ते सोनं! लिलावात दाखवला नाही भाव, पण विश्वास टाकणाऱ्या संघांसाठी चमकले ‘हे’ दिग्गज, यादी पाहाच






