गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जला 5 विकेट्सने पराभूत केले. पण यादरम्यान न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सन याला दुखापत झाली. माध्यमांतील वृत्तांनुसार विलियम्सनची दुखापत गंभीर असून संपूर्ण आयपीएल हंगामातून त्याला माघार घ्यावी लागू शकते.
गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघ फलंदाजी करताना 13 व्या षटकातनंतर केन विलियम्सन (Kane Williamson) याला मैदान सोडावे लागले. डीप स्केअर लेगला सीमारेषेजवर विलियम्सन क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. यावेळी एक चौकार रोखण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. परिणामी विलियम्सनला मैदान सोडावे लागले. दुसऱ्या डावात गुजरातने विलियम्सनच्या इम्पॅक्ट खेळाडूच्या रूपात साई सुदर्शनला याला मैदानात बोलावले.
विलियम्सनच्या दुखापतीविषयी अद्याप पुठली ठोस माहिती समोर आली नाहीये. पण स्पर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2023च्या उर्वरित सामन्यांमधून केन विलियम्सन खेळू शकणार नाहीये. याविषयी लवकरच गुजरात जायंट्सकडून अधिकृत माहितीही दिली जाऊ शकते.
Sad news: Kane Williamson's injury looks worse. pic.twitter.com/sKzQ2ZYEoN
— Johns. (@CricCrazyJohns) March 31, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याच विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागली. 20 षटकांमध्ये सीएसकेने 7 बाद 178 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. ऋतुराजने 50 चेंडूत ताबडतोड 92 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात गुजरातने हे लक्ष्य 19.2 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. गुजरातसाठी शुबमन गिल याने सर्वाधिक 63 धावांचे योगदान दिले. (IPL 2023 । Kane Williamson could be out for the entire season with a serious injury in the first match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या वादळी 92 धावांची झुंज अपयशी, गुजरातचा पहिल्या सामन्यात दणदणीत विजय
हेच ते दोन चेंडू, ज्यावर ऋतुराजने पंड्याला दाखवला पुणेरी दणका; खणखणीत षटकाराचा व्हिडिओ व्हायरल