कोलकाता स्थित इडन गार्डन स्टेडियमवर शनिवारी (20 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक केकेआरने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्स 15 गुणांसह सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. केकेआरविरुद्ध लखनऊने विजय मिळवला तर त्यांचे प्लेऑफचे तिकिट पक्के होईल. दुसरीकडे केकेआरकडे देखील प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी ही शेवटची संधी आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) म्हणाला, “आम्हाला मोठा विजय मिळवायचा आहे आणि आम्हाला सकारात्मक खेळायला आवडेल. यावर्षीच्या हंगामातील हा आमचा शेवटचा सामना आहे. अशात संघ आपले सर्वोत्तम प्रदर्शन करू इच्छितो.”
🚨 Toss Update 🚨@KKRiders win the toss and elect to field first against @LucknowIPL.
Follow the match ▶️ https://t.co/7X1uv1mCyL #TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/LjSVaag8LX
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
कोलकाता नाईट रायडर्स – रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नारेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चकारवार्थी.
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), करण शर्मा, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), आयुष बदोनी, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.
(Kolkata Knight Riders chose to bowl.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा रंगला धोनी-मॉरीसनमध्ये मजेदार कलगीतुरा, पाहा धोनीचा हजरजबाबीपणा
विराट-रोहित किंवा धोनी नाही, तर सलग 233 IPL सामने खेळण्याचा विक्रम ‘या’ पठ्ठ्याच्या नावे