---Advertisement---

आक्रमक गंभीरची मन जिंकणारी बाजू आली समोर! विराटसोबतचा जुना व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

On: मंगळवार, मे 2, 2023 4:37 PM
Virat Kohli Gautam Gambhir
---Advertisement---

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विराटने सोमवारी (1 मे) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीरला डीवच्यानंतर सामना संपल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. विराट आणि गंभीर यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. पण अशातच या दोघांचा एक जुना व्हिडिओही समोर येत आहे. या व्हिडिओत गंभीरने स्वतःला मिळालेला सामनावीर पुरस्कार विराटला दिल्याचे दिसते

2009 साली श्रीलंकन संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात श्रीलंकन संघाला भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची होती. मालिकेतील चौथा सामना कोलकातामध्ये खेळला गेला. श्रीलंकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 315 धावा कुटल्या. याच्या प्रत्युत्तरात आरसीबीने 48.1 षटकात विजय मिळवला. भारतीय संघासाठी गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांनी शतकी खेळी केली. विजयानंतर गौतम गंभीरला सामनावीर म्हणून निवडले गेले होते. पण गंभीरने हा पुरस्कार विराट कोहलीला दिला होता. विराटच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक असल्यामुळे गंभीरने हा निर्णय घेतला होता.

विराट आणि गंभीर याच्यातील वाद –

https://twitter.com/vishu_itsme/status/1653220306797105158?s=20

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात 224 धावांची भागीदारी झाली होती. गंभीरने 137 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. यात 14 चौकार होते. दुसरीकडे विराटने 114 चेंडूत 107 धावा साकारल्या होत्या. विराटने 11 चौकार आणि 1 षटकार मारला होता. विराटचे हे प्रदर्शन संघासाटी फायद्याचे ठरले असून सामना संपल्यानंतर गंभीरने त्याचे कौतुकही केले होते. आता विराट आणि गंभीरचा हा जुना व्हिडिओही सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Iamradhe_p00/status/1653111812496457728?s=20

दरम्यान, सोमवारी (1 मे) खेळल्या गेलेल्या आरसीबी आणि लखनऊच्या सामन्याचा विचार केला, तर आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांचा संघ अवघ्या 126 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सने 19.5 षटकात 108 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. विराटने या सामन्यात आरसीबीसाठी 30 चेंडूत 31 धावा केल्या. संघासाठी तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. विराटचा आरसीबी संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या, तर लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (A video of Virat Kohli and Gautam Gambhir from 2009 is going viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विरोधी संघाचा आदर करा…’, विराट आणि गंभीर एकमेकांना भिडताच कुंबळेची मोठी प्रतिक्रिया
विराटची शिकार करताच जल्लोष करत होता बिश्नोई, पण अंपायरने मारली चापट? व्हिडिओत लपलंय सत्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---