आयपीएल 2023चा 26 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांतील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे समाप्त झाला. लखनऊ संगाने या सामन्यात शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत 6 धावांनी विजय नोंदवला. अखेरच्या षटकात नवीन उल हक व आवेश खान यांनी धारदार गोलंदाजी करत संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.
Match 26. Lucknow Super Giants Won by 10 Run(s) https://t.co/vqw8WrjNEb #TATAIPL #RRvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
या सामन्यात लखनऊ संघाला कर्णधार केएल राहुल व कायले मेयर्स यांनी पुन्हा एकदा चांगली सुरुवात दिली. दोघांनी संघाला 10.4 षटकात 82 धावा करून दिल्या. त्यानंतर तिसऱ्य क्रमांकवर आयुष बडोनी याला बढती मिळाली होती. मात्र, तो केवळ एक धाव करू शकला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक हुडा याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या. परंतु, 4 चेंडूत त्याने केवळ 2 धावा काढल्या. निकोलस पूरन व मार्कस स्टॉयनिसने उपयुक्त योगदान देत संघाला 154 पर्यंत मजल मारून दिली.
राजस्थानसाठी धावांचा पाठलाग करताना जोस बटलर व यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा मोठी सलामी देण्यात यशस्वी ठरले. त्यांनी 87 धावा जोडल्या.मात्र, त्यानंतर राजस्थानचे फलंदाज लागोपाठ बाद होत गेले. अखेरच्या काही षटकांमध्ये पहिला सामना खेळत असलेल्या नवीन उल हक व आवेश खान यांनी टिच्चून गोलंदाजी करत राजस्थानला सलग चौथ्या विजयापासून रोखले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या स्टॉयनिस याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(IPL 2023 Lucknow Supergiants Beat Rajasthan Royals By 10 Runs Avesh Khan Naveen Ul Haq Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्ससाठी अजून एक मोठा धक्का! दुखापतग्रस्त खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर
रेकॉर्ड ब्रेक! लखनऊविरुद्धच्या पहिल्याच षटकात बोल्टने मोडला इरफान पठाणचा विक्रम





