आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात धावांचा अक्षरशा पाऊस पडला. लखनऊ सुपरजायंट्सने 213 धावांचा यशस्वी पाठलाग करत 1 विकेटने विजय मिळवला. यासह त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले.
https://twitter.com/IPL/status/1645487440612970497?t=MEBepEeBiiO62rSHdIl5PQ&s=19
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर अक्षरशः धावांचे तुफान आणले. पहिल्या सहा शतकात विराट कोहलीने वेगवान आक्रमण केले. त्याने 35 चेंडूंवर अर्धशतक झळकावले. त्याने 61 धावा काढल्या. त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी धावांचा वेग तसाच ठेवला. दोघांनी विरोधी गोलंदाजी झोडून काढली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण करत संघाला 200 पार नेले. मॅक्सवेलने 29 चेंडूवर 59 धावांची खेळी केली. तर कर्णधार प्लेसिसने 46 चेंडूवर नाबाद 79 धावा कुटल्या.
या धावांचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. त्यांनी आपले पहिले तीन फलंदाज 6 षटकातच गमावले होते. त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने काउंटर अटॅक करणारी खेळी केली. त्याने षटकार चौकारांची बरसात करत 30 चेंडूवर 65 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर जबाबदारी निकोलस पूरनने खांद्यावर घेतली. त्याने अक्षरशः आपल्या फलंदाजीने वादळ निर्माण करत 15 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. त्याने 19 चेंडूत 62 धावांची ऐतिहासिक खेळी केली. आयुष बडोनीने 30 धावांचे योगदान देत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या षटकात पाच धावांची गरज असतानाही लखनऊने अखेरच्या चेंडूवर निसटता विजय मिळवला.
(IPL 2023 Lucknow Supergiants Beat RCB By 2 Wicket Pooran Badoni Stoinis Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय विराट! लाजवाब अर्धशतकासह कोहलीने रचला आयपीएलमध्ये इतिहास, तो दुर्मिळ विक्रम नावे
चिन्नास्वामीचा ‘महाराजा’ बनला विराट! टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा पराक्रम केला नावावर






