आयपीएल 2023च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. चालू हंगामात दिल्लीने आतापर्यंत तीन, तर मुंबईने दोन सामने खेळले आहेत. पण दोन्ही संघांना अजून हंगामात पहिला विजय मिळवता आला नाहीये. अशात मंगळवारच्या (11 एप्रिल) सामन्यात कोणता संघ जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) मागच्या सामन्यात उपस्थित नव्हता. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याआधी आर्चरच्या दुखापतीच्या चर्चाही झाल्या. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तो मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, अशी शक्यता वर्चवली जात होती. मात्र या सामन्यात देखील आर्चर प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर आहे. दुसरीकडे दिल्लीसाठी यश धूल (Yash Dhool) आपले पदार्पण करत आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेविड वार्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश ढूल, रोवमन पॉवेल, ललित यादव, एक्सर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, एनरिक नार्जे, मुस्तफिजुर रहमान
मुंबई इंडियंस – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, ऋतिक शोकीन, अरशद खान, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ.
(Rohit Sharma won the toss and decided to bowl first)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला
षटकार मारूनही धावसंख्या तितकीच! पाहा 19व्या षटकात बदोनीने कशी गमावली विकेट