आजचा म्हणजेच 2 एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास आहे. कारण, याच दिवशी भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकला होता. धोनीने खणखणीत षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला होता. विश्वचषक जिंकण्याचा क्षण आजही 12 वर्षांनंतर चाहत्यांच्या मनात कायम आहे. भारताने 1983 विश्वचषकानंतर भारताने वनडे विश्वचषक आपल्या नावावर केला होता. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये, पण तो इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करतोय. यादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने शानदार शॉट मारून 2011 विश्वचषकाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत एमएस धोनी (MS Dhoni) सराव सत्रादरम्यान गगनचुंबी षटकार खेचताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सीएसकेने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा जुन्या आठवणी ताज्या होतात.” या व्हिडिओला आतापर्यंत 68 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
When nostalgia hits! 🥺💛#AndhaNaalGnyabagam #WhistlePodu #Yellove 🦁 @msdhoni pic.twitter.com/VVjdYd6VwE
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 1, 2023
या व्हिडिओत धोनी त्याचप्रकारे षटकार ठोकताना दिसत आहे, ज्याप्रकारे त्याने श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक 2011च्या अंतिम सामन्यात मारला होता. हा ऐतिहासिक क्षण होता, ज्याने संपूर्ण देशाला उत्सव साजरा करण्याची संधी दिली होती.
एमएस धोनी याने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्याची गणना जगातील सर्वात यशस्वी आणि दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये होते. तो त्याच्या समर्पण, प्रतिबद्धता आणि कठोर मेहनतीने युवा क्रिकेटपटूंना प्रेरित करतो. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यानचा त्याचा षटकार जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही कायम आहे.
आयपीएल 2023मधील पहिला पराभव
आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात सीएसकेला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला होता. या सामन्यात सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली होती. आता 3 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात स्पर्धेचा सहावा सामना एम ए चिदंबरम स्टेडिअम, चेन्नई येथे खेळला जाईल. (ipl 2023 ms dhoni recreates iconic 2011 world cup final six ahead of csk vs lsg see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
मार्करमऐवजी भुवीने उधळला टॉस, राजस्थान करणार पहिली बॅटिंग; महत्त्वाचा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर