चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळला. चेपॉक स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघाने 12 धावांनी शानदार विजय मिळवला. तसेच, स्पर्धेतील विजयाचे खाते उघडले. या सामन्यानंतर ‘कॅप्टून कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने त्याच्याच संघाच्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. त्याने यावेळी कर्णधारपद सोडण्यापर्यंतचे भाष्य केले.
वेगवान गोलंदाजांवर नाराजी
सामन्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) याने वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तो म्हणाला की, “वेगवान गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. परिस्थितीनुसार गोलंदाजी केली पाहिजे. महत्त्वाची बाब ही आहे की, विरोधी संघाचे गोलंदाज काय करत आहेत, यावर लक्ष ठेवले पाहिजे. आणखी एक गोष्ट अशी की, त्यांनी वाईड आणि नो-बॉल टाकला नाही पाहिजे किंवा त्यांना एका नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल. ही माझी दुसरा चेतावणी असेल आणि मी बाजूला होईल.”
#CSK bowlers today bowled 13 wides and 3 no balls against #LSG and Captain @msdhoni, in his inimitable style, had this to say. 😁😆#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/p6xRqaZCiK
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
चेन्नईच्या गोलंदाजांकडून वाईड आणि नो-बॉलचा पाऊस
आयपीएल 2023 स्पर्धेतील सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Chennai Super Kings vs Lucknow Super Giants) संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी खूप खराब कामगिरी केली. या सामन्यात त्यांनी एकूण 3 नो-बॉल आणि 13 वाईड चेंडू फेकले. अशाप्रकारे संघाने 18 धावा अधिकच्या खर्च केल्या. दुसरीकडे, लखनऊचे गोलंदाज याबाबतीत खूपच मागे राहिले. लखनऊच्या गोलंदाजांनी या सामन्यात 1 नो-बॉल आणि 7 वाईड चेंडू टाकले.
यामध्ये तुषार देशपांडे (Tushar Deshpande) याने 4 षटके गोलंदाजी करताना 45 धावा खर्च केल्या. त्यात 3 नो-बॉल आणि 4 वाईड चेंडूंचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त दीपक चाहर याने 5 आणि राजवर्धन हंगरगेकर याने 3, तर मोईन अली याने 1 वाईड चेंडू टाकला. खरं तर, पहिल्या सामन्यातही चेन्नईच्या गोलंदाजांनी 2 नो-बॉल आणि 4 वाईड चेंडू टाकले होते.
चेपॉकच्या खेळपट्टीने धोनी चकित
खेळपट्टीबाबत बोलताना धोनी म्हणाला की, “शानदार सर्वाधिक धावांचा खेळ. आम्ही विचार करत होतो की, खेळपट्टी कशी असेल. हा पहिला सर्वोत्तम खेळ होता, जो होऊ शकत होता. मला वाटले की, ही खेळपट्टी धिमी होईल. मात्र, ही अशी खेळपट्टी होती, जिथे तुम्ही धावा करू शकत होता. मी खेळपट्टीने चकित होतो.”
चेन्नईचा पुढील सामना
चेन्नई सुपर किंग्स संघाचा पुढील सामना शनिवारी (दि. 8 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध असून हा सामना वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. (ipl 2023 ms dhoni statement after chennai super kings against lucknow super giants match mahi warn his bowlers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेयर’ तुषार देशपांडेच्या नावे लाजिरवाणा विक्रम! सिराजनंतर आयपीएल इतिहासात केली ही नकोशी कामगिरी
चार वर्षांनंतर चेपॉकवर चेन्नईचे चांगभलं! लखनऊला नमवत आयपीएलमध्ये फोडला विजयाचा नारळ