आयपीएल 2023 चा 22वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतत मुंबईने सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. वेंकटेश अय्यरने झळकावलेल्या शतकानंतरही केकेआरला या सामन्यात 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.
2⃣ wins in a row for @mipaltan! 👏 👏#MI beat #KKR by 5 wickets to bag two more points! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/CcXVDhfzmi #TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/9oYgBrF0Fe
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई आपला नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उतरली. मुंबईने या सामन्यात अर्जुन तेंडुलकर व डुआन जेन्सन यांना पदार्पणाची संधी दिली. मुंबईने प्रथम गोलंदाजी करताना पहिले यश लवकर मिळवले. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने केकेआरचा डाव सावरला. त्याने सर्व खेळाडूंना हाताशी धरत संघाची धावसंख्या पुढे नेली. यादरम्यान त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. अखेरीस आंद्रे रसेल याने केलेल्या काहीशा फटकेबाजीमुळे केकेआर 185 पर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला.
या धावांचा पाठलाग करताना मुंबईला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या रोहित शर्मा व ईशान किशन यांनी वादळी सुरुवात दिली. 4.5 षटकात दोघांनी 65 धावा कुटल्या. रोहित बाद झाल्यानंतर ईशानने हंगामातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी मुंबईसाठी तीच धावगती कायम राखली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी 60 धावा काढल्या. विजय जवळ असताना ते दोघे देखील बाद झाले. टीम डेव्हिडने नाबाद 24 धावा करून संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला.
(IPL 2023 Mumbai Indians Beat Kolkata Knight Riders By 5 Wickets Venkatesh Iyer Suryakumar Yadav Ishan Kishan Shines)